Nashik District Hospital sakal
नाशिक

Nashik News : स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळले!

Nashik News : कालव्यालगत शनिवारी सकाळी स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे जिवंत अर्भक पोलिसांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कालव्यालगत शनिवारी (ता. २६) सकाळी स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे जिवंत अर्भक पोलिसांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कालव्याच्या रस्त्याने मजूर जात असताना परिसरातील महाविद्यालयाजवळ रस्त्यावर सिमेंट गोणीवर नवजात जिवंत अर्भक दिसले. (live female infant was found)

अर्भक जिवंत असल्याने मजुराने पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर रुग्णवाहिकेला पाचारण करून त्या अर्भकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सीताराम तुळशीराम पवार हे मिस्तरी काम करून आपली उपजीविका करतात.

शनिवारी सकाळी कामावर जात होते. सकाळी साडेसातच्या सुमारास डावा तट कालव्यालगत झाडाखाली बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. सीताराम यांनी जाऊन बघितले असता एक अर्भक आढळून आले. (latest marathi news)

ही बाब तत्काळ पोलिसांना कळविली. पंचवटी निर्भया मोबाईल पथकाने घटनास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी सदर अर्भक एक स्त्री जातीचे लक्षात आले. ते भुकेने व्याकूळ होऊन रडत असल्याचे समजले.

विशेष म्हणजे या भुकेने व्याकूळ असलेल्या अर्भकास महिला अंमलदार हिने स्वतःचे स्तनपान देऊ केले व ऊब निर्माण केली आणि पुढील उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT