LLB Admission esakal
नाशिक

LLB Admission : एलएलबी नोंदणीला बुधवारपर्यंत मुदतवाढ! प्रवेशाच्या सुधारित वेळापत्रकाची प्रतीक्षा कायम

Nashik News : पदवी अभ्यासक्रमानंतर विधी शाखेतील तीन वर्षांच्या ‍या एलएलबी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याअंतर्गत नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पदवी अभ्यासक्रमानंतर विधी शाखेतील तीन वर्षांच्या ‍या एलएलबी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याअंतर्गत नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. त्‍यानुसार बुधवार (ता. २४) पर्यंत नोंदणी करता येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश सध्या सुरू आहेत. (LLB registration extended till Wednesday)

याअंतर्गत तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश नोंदणीची मुदत शुक्रवार (ता. १९) पर्यंत होती. निर्धारित मुदतीत नोंदणी करू न शकलेल्‍या विद्यार्थी, पालकांनी सीईटी सेलला फोनद्वारे व ई-मेलच्‍या माध्यमातून संपर्क साधताना मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्‍यानुसार आता सीईटी सेलने नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

सीईटी परीक्षा दिलेल्‍या विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी बुधवार (ता. २४)पर्यंत मुदत असणार आहे. दरम्‍यान, या मुदतवाढीच्‍या निर्णयामुळे पुढील प्रवेश वेळापत्रकाच्‍या तारखांमध्येही बदल होणार आहे. यापूर्वीच्‍या वेळापत्रकानुसार येत्‍या मंगळवारी (ता. २३) प्रारूप गुणवत्तायादी प्रसिद्ध होणार होती.

परंतु आता नोंदणीच्‍या मुदतीत वाढ केल्‍याने नोंदणीकृत विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्‍यामुळे मुदतवाढीचा निर्णय जाहीर केला असला, तरी त्‍यासोबत सुधारित प्रवेश वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्‍यामुळे पुन्‍हा मुदतवाढ दिली जाते, की वेळापत्रक जाहीर करून त्‍यानुसार पुढील प्रक्रिया राबविली जाते, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे. (latest marathi news)

पाच वर्षे एलएलबीचे प्रवेश सुरुरू

बारावीनंतर पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाला सुरवात झाली आहे. वेळापत्रकानुसार शुक्रवारी (ता. १९) अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्ध केली आहे. आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविण्यासाठी ऑप्‍शन फॉर्म भरण्याची २२ ते २५ जुलैपर्यंत मुदत असेल. तर पहिल्‍या फेरीची निवड यादी २९ जुलैला प्रसिद्ध होऊन विद्यार्थ्यांना ३० जुलै ते २ ऑगस्‍टदरम्‍यान प्रवेश घेण्याची संधी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT