nashik lockdown esakal
नाशिक

नाशिक लॉकडाऊन शिथिल : बाजार समित्या, औद्योगिक क्षेत्राला दिलासा

विनोद बेदरकर

नाशिक : जिल्‍ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (corona positive patients) संख्या घटत असल्याने, जिल्ह्यात २३ मेपर्यंत लागू असलेले कडक निर्बंध (lockdown) सोमवार (ता. २४)पासून शिथिल करण्यात येणार आहेत; परंतु राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ (break the chain) अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी सांगितले.

बाजार समित्या, औद्योगिक क्षेत्राला दिलासा

भुजबळ म्हणाले, की राज्याचे ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध जसेच्या तसे लागू करून जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्र व बाजार समित्यांमध्ये कडक अंमलबजावणीच्या अधीन राहून परवानगी देण्यात यावी. उद्योग सुरू करताना कारखान्यात येणाऱ्या प्रत्येक कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी घेत असल्याचे कंपनीचे हमीपत्र घ्यावे. कारखान्यांमध्ये कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून कामकाज सुरू करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू होत्या; परंतु यापुढे जीवनावश्यक सेवा राज्य शासनाच्या निर्बंधांनुसार सुरू राहतील. जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, की म्युकरमायकोसिसबाबत टास्क फोर्सकडून आलेल्या सूचना प्रत्येक कोविड रुग्णालयाला देण्यात आल्या आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सर्व नियोजन करण्यात येत आहे.

पालकमंत्री भुजबळ : लॉकडाउनमधील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

पालकमंत्री भुजबळ यांनी मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, मालेगाव महापालिकेचे भालचंद्र गोसावी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: सूरज चव्हाणने घेतलं अजितदादांच्या चितेचं दर्शन; भावुक होत म्हणाला, मी कोणाकडे बघायचं...

Yogi Government : योगी सरकारचा मास्टरस्ट्रोक! १५ लाख शिक्षकांसाठी ४४८ कोटींची मोफत आरोग्य कवच योजना

Agriculture News : जळगावात भाजीपाला स्वस्त, पण शेतकरी त्रस्त! उत्पादन खर्चही निघेना, बळीराजा पुन्हा संकटात

Latest Marathi News Live Update : भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला

Ajit Pawar : आसमंतात झेपावणाऱ्या ज्वाळांना हात जोडत कार्यकर्त्यांनी दादांना दिला अखेरचा निरोप!

SCROLL FOR NEXT