Govindrao Hari Deshpande, Bhanudas Ramachandra Kavade, Vitthalrao Hande, Dr. Prataprao Wagh, Dr. Vasantrao Pawar, Madhavrao Patil, Hemant Godse
Govindrao Hari Deshpande, Bhanudas Ramachandra Kavade, Vitthalrao Hande, Dr. Prataprao Wagh, Dr. Vasantrao Pawar, Madhavrao Patil, Hemant Godse esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : 9 खासदारांना मिळाली 50 टक्क्यांपेक्षा अधिक पसंती! कवडे यांना सर्वाधिक 74 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा

संजय वाघ : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लोकसभेसाठी आतापर्यंत झालेल्या एकूण १७ निवडणुकांमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आलेल्या १७ जणांपैकी ९ खासदारांनी एकूण वैध मताच्या ५o टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळविली आहेत. या मतदारसंघात सर्वाधिक विक्रमी ७४ टक्के मते मिळविल्याची नोंद भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे भानुदास कवडे यांच्या नावावर नोंदली गेली आहे. त्या खालोखाल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे गो. ह. देशपांडे, इंदिरा काँग्रेसचे डॉ. वसंतराव पवार व माधवराव पाटील यांनी ५७ टक्के मते मिळविली आहेत. (Nashik Lok Sabha Constituency election 2024 preference news)

१९५१ ते २०१९ पर्यंत लोकसभेच्या१७ सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यात १९६२ साली झालेल्या तिसऱ्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार गोविंदराव हरी देशपांडे यांना एकुण वैध मतांच्या ५७ टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत त्यांना ११०२४२ मते मिळाली होती. त्यानंतर १९६७ साली झालेल्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार भानुदास रामचंद्र कवडे यांना एकण वैध मतांच्या ५१ टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत त्यांना १५५६३२ एवढी मते मिळाली होती.

१९७१ साली झालेल्या लोकसभेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार भानुदास रामचंद्र कवडे यांना एकूण वैध मतांच्या ७४ टक्के इतकी विक्रमी मते मिळाली होती. त्यावेळी त्यांना २०८८९८ इतकी मते मिळाली होती.

त्यानंतर १९७७ साली झालेल्या सहाव्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय लोकदलाचे उमेदवार विठ्ठलराव हांडे हे विजयी झाले होते. त्यांना एकूण वैध मतांच्या ५१ टक्के इतकी मते मिळाली होती. त्यांना या निवडणुकीत १४४ ५५५ इतकी मते मिळाली होती.

१९८० साली झालेल्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. प्रतापराव वाघ यांना एकूण वैध मतांच्या ५३ टक्के इतकी मते मिळाली होती. त्यांना यावेळी २०४ १५५ एवढी मते मिळाली होती. त्यानंतर १९९१ साली झालेल्या दहाव्या लोकसभेच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. वसंतराव पवार यांना एकूण वैध मतांच्या ५७ टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत डॉ. पवार यांनी ३१०२४७ इतकी मते मिळविली होती. (latest marathi news)

१९९८ मध्ये झालेल्या बाराव्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यावेळचे इंदिरा कॉग्रेस पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील यांना एकूण वैध मतांच्या५७ टक्के इतकी मते मिळाली होती. या निवडणुकीत त्यांना ३८१३०० एवढी मते मिळाली होती. त्यानंतर २०१४ साली झालेल्या सोळाव्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना एकूण वैध मताच्या ५२ टक्के मते मिळाली होती.

त्यांना एकूण ४९४ ७३५ इतकी मते मिळाली होती. विजयाची हिच परंपरा गोडसे यांनी २०१९ च्या निवडणूकीत कायम ठेवली होती. शिवसेनेच्या तिकीटावर लढविलेल्या या निवडणूकीत त्यांनी झालेल्या मतदानापैकी ५०.२७ टक्के मिळविली होती. त्यांना एकूण ५,६३,५९९ मते मिळाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT