Vijay Karanjkar, Sudhakar Badgujar esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : विजय करंजकरांच्या मनात वेगळ्या घराचा विचार : सुधाकर बडगुजर

Lok Sabha Election 2024 : शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा त्यांना मातोश्रीवर बोलवले होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा त्यांना मातोश्रीवर बोलवले होते. पण त्यांच्या मनात वेगळाच घरोबा करण्याचा विचार असल्यामुळे कदाचित ते तिथपर्यंत पोचले नसतील, असा संशय जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला आहे. (Nashik Lok Sabha Constituency election 2024 Sudhakar Badgujar troll Vijay Karanjkar news)

महाविकास आघाडीकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ (पराग) वाजे यांचे नाव निश्‍चित झाल्यानंतर विजय करंजकर हे नाराज झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेत आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असा निर्णय घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिलला दुपारी साडेबाराला त्यांना मातोश्रीवर बोलवले.

ते न गेल्याने त्यांना पुन्हा निरोप देण्यात आला. परंतु विजय करंजकर तिथपर्यंत गेलेच नाहीत, असा खुलासा जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सोमवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत केला. या वेळी शहराध्यक्ष विलास शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड आदी उपस्थित होते.  (Nashik Political News)

करंजकर दोन दिवसांपासून ‘वर्षा’वर

विजय करंजकर हे दोन दिवसांपासून मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू आहे. तसेच त्यांचा लवकरच शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश होणार असल्याचे शिवसैनिक सांगतात. माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या पाठोपाठ करंजकर यांच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाला ऐन निवडणुकीत दुसरा धक्का बसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गात पावसाचं दणक्यात पुनरागमन! घाटमाथ्यावरही धुवाधार; पुढील तीन ते चार दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज

ढिंग टांग : ऑल इज वेल..!

Pune: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी, पुढील चार दिवस यलो अलर्ट

Paithan Road Accident : पैठणमध्ये पिकअपची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Pune: पुण्यासह जिल्ह्यात ‘नीट’ परीक्षा शांततेत; पोलिसांचा ६३ केंद्रांवर कडक बंदोबस्त; सीसीटीव्हीची करडी नजर

SCROLL FOR NEXT