Sharad Pawar, Mallikarjun Kharge esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणणार प्रचारात रंगत! 12 ला दोंडाईच्यात, तर 16 सटाण्यात सभा

Lok Sabha Constituency : अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे धुळे लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik New : धुळे लोकसभा मतदारसंघात उन्हाचा तडाखा वाढत आहे. या वातावरणात काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार करीत वातावरण तापवले आहे. यात काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्या मदतीला वरिष्ठ नेते धावून येणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे धुळे लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. (Nashik Lok Sabha Constituency)

धुळे मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या डॉ. बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. डॉ. बच्छाव यांच्या नावाची घोषणा झाल्यावर पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांना विरोध केला होता. नाशिक आणि धुळेच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामे देत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात बच्छाव यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या.

मात्र आता डॉ. बच्छाव यांनी मतदारसंघातील प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. धुळे शहरासह ग्रामीण भागात महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि नेते त्यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. विशेषत: मालेगाव शहरातील मतदारांना पक्षाकडे वळविण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. (Latest Marathi News)

गत आठवड्याभरात मतदारसंघात नाराज नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन ही नाराजी दूर करण्यात त्या यशस्वी झाल्याचे दिसत आहे. धुळ्याचे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. धुळे मतदारसंघातील प्रचारासाठी येत्या १२ मेस काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दोंडाईचा येथे सभा घेणार आहेत.

या सभेसाठी जिल्हाध्यक्ष सनेर यांनी पुढाकार घेतला आहे. सभेचे सर्व नियोजन ते करणार आहे. याशिवाय राज्यातील महाविकास आघाडीचे नेते शरद पवार व संजय राऊत येत्या १६ मेस सटाणा येथे काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेणार आहेत. या सभेमुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराला चालना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

MS Dhoni Fitness: धोनीला तंदुरुस्त होण्यास किती वेळ लागेल सांगणे अवघड, ब्रेव्हिस...; CSK च्या ताफ्यातून धक्कादायक बातमी समोर

SCROLL FOR NEXT