Adv. Manikrao Kokate, Hemant Godse
Adv. Manikrao Kokate, Hemant Godse esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : वाजेंना रोखण्यासाठी माणिकराव कोकाटेंच्या नावावर विचार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभेचा पेच काही केल्या सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. सुमारे २७ दिवसांपासून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे प्रचाराला लागलेले आहेत. मात्र, महायुतीच्या जागेचा आणि उमेदवारीचा फैसला झालेला नाही. या ट्विस्टमध्ये सुरवातीला थोडे मागे असलेले नाव आता पुढे येत आहे. राजाभाऊ वाजे यांना आता सिन्नरमध्येच रोखायचे झाल्यास ‘राष्ट्रवादी’चे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा नव्याने विचार सुरू झाला आहे. (Nationalist MLA Adv Manikrao Kokate name has been reconsidered )

नाशिकसंदर्भात दोन पेच आहेत. एक म्हणजे ही जागा महायुतीमधील कुठल्या पक्षाने लढवायची? तर दुसरा म्हणजे त्या पक्षाचा उमेदवार कोण असेल? शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), भारतीय जनता पक्ष हे तिन्ही पक्ष नाशिकसाठी हट्टाला पेटलेले आहेत. निवडणुकीचे अर्ज भरण्याची शुक्रवार (ता. २६)पासून सुरवात होत आहे. त्यामुळे आता अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हा विषय जाणार का, अशी चर्चा सर्वसामान्य मतदारांमध्ये निर्माण होताना दिसून येते.

वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेची जागा असल्याने जर शिवसेनेला ही जागा राखण्यात यश आले तर विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे उमेदवार असतील. मात्र, गोडसे यांच्याबद्दल असलेल्या सर्वपक्षीय आणि सर्वस्तरीय नाराजीमुळे पेच अधिक वाढला आहे. भाजपकडे जागा गेल्यास ज्येष्ठ नेते दिनकर पाटील हे प्रबळ दावेदार आहेत. सध्या ते मुंबई मुक्कामी आहेत. भाजपचे आमदार अॅड. राहुल ढिकले यांचेही नाव अधूनमधून चर्चेत येते.

‘राष्ट्रवादी’तून मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतलेली असली, तरी त्यांनीही ‘राष्ट्रवादी’चा दावा कायम असल्याचे म्हटले आहे. त्यात आमदार ॲड. कोकाटे यांचे नाव सध्या अग्रभागी आहे. वस्तुतः शिवसेनेचे युवा नेते श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये येऊन हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्यावर महायुतीतील पक्षांना धक्का बसला. तेव्हापासून नाशिक राज्यभर चर्चेत आले. (Nashik Political News)

परंतु, सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नावाची घोषणा विजय करंजकर यांच्याऐवजी करण्यात आल्यावर महायुतीसमोरील संकटे अधिक वाढली. आता वाजे यांचा प्रचार खूप पुढे गेला आहे. सिन्नरमध्ये वाजे यांना मोठे समर्थन मिळेल, हे आडाखे आतापासून बांधले जात आहेत. वाजे यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेसमोर उमेदवार देणे हा महायुतीसमोरील खरा पेच आहे.

किंबहुना, यामुळे आता सिन्नरचे आमदार आणि वाजे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी ॲड. कोकाटे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले. कोकाटे यांच्या नावावर राज्यस्तरावर खलबते सुरू आहेत. ही जागा शिवसेनेची असली, तरीही ‘डेंजर झोन’मध्ये असल्याने विद्यमान खासदारांच्या पारड्यात वजन टाकायचे का, हा प्रश्न आहे. कोकाटे हे वाजेंना सिन्नरमध्ये रोखू शकतात, असा महायुतीच्या नेत्यांचा होरा आहे.

‘राष्ट्रवादी’च्या आमदारांची संख्या सर्वाधिक असल्याने तोही फायदा कोकाटे यांना मिळू शकतो. नाशिक शहरातील मतदारसंघांमध्ये कोकाटे हे परिचित आहेत, त्यामुळे शहरात जिथे वाजेंना खूप कष्ट करावे लागतील, तिथे कोकाटे अधिक प्रभावी ठरू शकतात. या सगळ्या शक्यतांवर विचार सध्या सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेकडे जागा राहिल्यास हेमंत गोडसे किंवा राष्ट्रवादीचा विचार झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्याभोवती सध्या चर्चा फिरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT