Sharad Pawar, Prime Minister Narendra Modi, Uddhav Thackeray esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : महायुती विरुध्द महाविकास आघाडीत प्रचार युध्द

Lok Sabha Constituency : दिंडोरीत गड भक्कम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: मैदानात उतरणार असल्याने त्यानंतर महाविकास आघाडीकडून शरद पवार व उद्धव ठाकरे दिंडोरी व नाशिकसाठी दोन दिवस तळ ठोकणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघात जवळपास चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचाराकडे उमेदवारांनी लक्ष दिले आहे. प्रचाराचे नियोजन करताना शेवटच्या टप्प्यात नाशिक व दिंडोरीमध्ये महाविकास आघाडी विरुध्द महायुती असे प्रचार युध्द पाहायला मिळणार आहे. (Nashik Lok Sabha Constituency)

दिंडोरीत गड भक्कम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: मैदानात उतरणार असल्याने त्यानंतर महाविकास आघाडीकडून शरद पवार व उद्धव ठाकरे दिंडोरी व नाशिकसाठी दोन दिवस तळ ठोकणार आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता सहा मे रोजी माघारी आहे.

माघारीनंतर खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल. अशीच परिस्थिती दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये आहे. दोन्ही मतदारसंघात उमेदवारांकडून सध्या प्रचारावर भर दिला जात आहे. मात्र उमेदवारांच्या जोडीला महायुती व महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची फौज दाखल होणार आहे. महायुतीकडून दिंडोरीचा गड भक्कम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे दहा मे रोजी सभा होणार आहे.

त्याचबरोबर महायुतीचे अन्य नेते देखील नाशिक व दिंडोरीमध्ये प्रचाराचे मैदान गाजविणार आहेत. महायुतीकडून प्रचाराचे योग्य नियोजन केले जात असताना महाविकास आघाडीने देखील वरिष्ठ नेत्यांची फौज मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा होणार आहे. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीची संयुक्त सभा

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी शरद पवार तीन सभा घेणार आहेत. वणी येथे १५ मे व १६ मे रोजी लासलगाव तसेच नांदगाव येथे सभा होणार आहेत. नाशिक तालुक्यातील सय्यदपिंपरी येथे देखील सभा घेण्याचे नियोजन आहे.

शरद पवार व उद्धव ठाकरे यांची अनंत कान्हेरे मैदानावर संयुक्त सभा घेण्याचे नियोजन १५ मे रोजी करण्यात आले आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची १२ मे रोजी देवळाली येथे प्रचार सभा होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.

बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यादेखील सभा होणार आहेत. त्याचबरोबर १७ मे रोजी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सिन्नर व सिडकोत सभा होतील. खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, मेहबूब शेख, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांची सभा घेण्याचे नियोजन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT