Grand Alliance candidate Hemant Godse met State Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal at Bhujbal Farm. esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : सोशल मीडियावर दहा वर्षांपूर्वीच्या घटनांना उजाळा! महायुतीच्या विजयासाठी भुजबळ-गोडसे भेट

Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी भुजबळ फॉर्मवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सन २०१४ च्या छगन भुजबळ तर सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी भुजबळ फार्मवर छगन भुजबळ यांची भेट घेतली. (Nashik Lok Sabha Constituency)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आल्याचा दावा गोडसे यांनी केला असला तरी सोशल मिडियावर मात्र सन २०१४ च्या निवडणुकीतील भुजबळ-गोडसे वादाला फोडणी मिळाली. नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी आज भुजबळ फॉर्मवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे आदी यावेळी उपस्थित होते. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गोडसे विरुध्द भुजबळ वाद टोकाला गेला होता. मराठा-ओबीसी अशी किनार या निवडणुकीला मिळाली. त्यानंतरच्या सन २०२९ च्या निवडणुकीत मोदी लाट असली तरी पुन्हा मराठा-ओबीसी वादाचा अंक देखील चालला.

त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ राज्यात चर्चेला आला. परंतू मागील दोन ते अडिच वर्षात राजकारणाचे वारे अचानक फिरले. या बदलत्या सत्तेच्या राजकारणात शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटले. या दोन्ही पक्षातील अनुक्रमे एकनाथ शिंदे व अजित पवार या स्वतंत्र गटाने भाजप सोबत युती करीत सत्तेत सहभागी झाले. (latest marathi news)

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील सर्वच घटक पक्ष एकत्र आले. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. परंतु भुजबळ व गोडसे भेटीला राजकारणापेक्षा सामाजिक किनार मोठी आहे. त्यामुळे भुजबळ फार्मवर महायुतीचे उमेदवार गोडसे यांनी भेट दिल्यानंतर सोशल मिडियावर अधिक चर्चा रंगली आहे.

कालचे दुश्‍मन, आजचे दोस्त

गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर टिका होण्याच्या भितीने पालकमंत्री दादा भुसे यांनी भुजबळ यांची भेट घेतली होती. परंतु आज गोडसे यांनी भुजबळ यांची निवासस्थानी भेट घेतली. राजकारणात कालचे दुश्‍मन आजचे दोस्त, आजचे दोस्त उद्याचे दुश्‍मन होऊ शकतात याचा प्रत्यय नाशिककरांना आला. यावरून गोडसे सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

रितेश देशमुखची शाळा पाहिलीत का? ना मुंबई, ना लातूर; 'या' ठिकाणी शिकलाय अभिनेता, मैदान पाहाल तर पाहतच राहाल

Latest Marathi News Updates : घनसावंगी शिवारातील पाझर तलाव फुटला

Sillod Rain : तीन तासाच्या पावसाने सर्वत्र दाणादाण; आमठाणा मंडळात 70 मिलिमीटर पाऊस, नऊ गावांचा काही तासासाठी तुटला संपर्क

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

SCROLL FOR NEXT