Nashik Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : गावपातळीवरील नेत्यांना वरिष्ठांच्या निर्णयाचे टेन्शन; मताधिक्क्यासाठी दिलेल्या शब्दाबाबत धाकधूक

Lok Sabha Constituency : 'यंदा गुलाल आमचाच...’. असे एकमेकांना सांगताना सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे होत आहेत. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर मताधिक्क्याबाबत दिलेला शब्द सार्थ ठरतो की नाही याबाबत गावच्या नेतेमंडळींसह तालुका पातळीवरील नेत्यांना आता वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाचे टेन्शन येऊ लागले आहे. ग्रामीण भागात मात्र निकालाच्या चर्चांना उधाण आले आहे. (Nashik Lok Sabha Constituency)

'यंदा गुलाल आमचाच...’. असे एकमेकांना सांगताना सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे होत आहेत. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील अखेरचा म्हणजेच सातवा टप्पाही पूर्णत्वास गेला आहे. त्यामुळे निकालासाठी अवघे काही तासच बाकी राहिले आहेत. मागच्या सहा टप्प्यांतील संभाव्य निकालाबाबत संपूर्ण देशभर चर्चा सुरू आहे.

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी अशा सर्व सहा- सात पक्षांमध्ये लढल्या गेलेल्या निवडणुकीतील कौल नेमका कोणाच्या बाजूने असेल, हे सांगता येईना. मात्र, निवडणुकीदरम्यान प्रत्येक पक्षाने संपूर्ण ताकदीने निवडणूक लढवली आहे.

यात प्रत्येक गावपातळीवरच्या नेत्यांपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारांनी आपापल्या वरिष्ठ नेत्यांना आपल्या गावातून, शहरातून, तालुक्यातून आपल्याच पक्षाला मताधिक्य मिळेल, असा शब्द दिलेला आहे. तो शब्द खरा होणार का, याची चिंता नेतेमंडळींना सतावत आहे. कारण ही निवडणूक अगदी ग्रामपंचायत निवडणुकीसारखी रस्सीखेच निर्माण करणारी झाली होती. (latest marathi news)

गावचे सरपंच, पंचायत समितीचे माजी सदस्य आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांनी आमदारांना माझे गाव इतके लीड पक्षाला देईल अशी वचने, शपथ घेतली होती. आता या निवडणुकीचा निकाल जवळ आल्याने नेतेमंडळींची कसोटी लागणार आहे.

काही ठिकाणी विरोधी पक्ष ताकदवान दिसत आहे. त्यांनी पुढच्या निवडणुकीचा विचार करून मला या वेळी कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी मताधिक्य द्यावे लागेल, असे सांगितले गेल्याने गावपातळीवरचे सर्वच नेते टेन्शनमध्ये दिसू लागले आहेत.

निकालापूर्वी 'बॅनर वॉर'

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुती, महाविकास आघाडी, अपक्ष उमेदवार, वंचित बहुजन आघाडी थेट लढतीत कोण विजयी होणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच मतदारसंघातील सिन्नर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे प्रचंड बहुमताने विजयी, नाशिकचे खासदार असे विजयाचे बॅनर मागील आठवड्यात लागल्याने हा एक चर्चेचा विषय जिल्ह्यात रंगला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : २०१६ला नीटचा पेपर फुटला तेव्हा PM मोदींना कॉल केलेला; राज ठाकरे काय म्हणाले?

Ahilyadevi Holkar Loan Waiver : कर्जमाफी अन् 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान! 41 हजार 552 शेतकऱ्यांचे खाते होणार नील; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

KDMC: परवानगी १४ मजल्यांची, बांधले २१ इमले; सात मजले बेकायदा, बिल्डरसह केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Ratnagiri Tourism : मिनी महाबळेश्वर' माचाळमधील प्रसिद्ध 'भिषाचा कडा' बनतोय धोकादायक! 'उलट्या धबधब्यावर' पर्यटकांचा जीव धोक्यात; तातडीने सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT