Nashik Lok Sabha Election esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : जिल्ह्यात 2 लाख पोस्टल मतदार; दिव्यांग व 80 वर्षांवरील व्यक्तींना संधी

Lok Sabha Election : जिल्ह्यातील ४७ लाख ४८ हजार मतदारांमध्ये साधारणतः दोन लाख पोस्टल मतदारांचा समावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : जिल्ह्यातील ४७ लाख ४८ हजार मतदारांमध्ये साधारणतः दोन लाख पोस्टल मतदारांचा समावेश आहे. त्यांना घरबसल्या मतदान करण्याची संधी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. मतदारांसाठी पोस्टल मतदान हा पर्याय ऐच्छिक असल्यामुळे ऐनवेळी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊनही मतदान करणाऱ्यांची संख्या वाढू शकते. लोकसभा निवडणुकीसाठी ४० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. (Nashik Lok Sabha Election 2 lakh postal voters in district marathi news)

नाशिक शहरासह दिंडोरी लोकसभा व मालेगाव, बागलाणच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदारसंघातील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु काही कर्मचाऱ्यांचे नाव दुसऱ्या मतदारसंघात असेल तर त्यांना पोस्टल मतदान करणे शक्य होणार आहे. ज्या मतदारसंघात निवडणुकीची जबाबदारी असेल त्याच मतदारसंघात इतरत्र मतदारयादीत नाव असेल तर त्यांना जबाबदारीच्या ठिकाणी मतदान करता येणार आहे.

दहा हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही हाच नियम लागू राहील. जिल्हाबाहेर नाव असलेले कर्मचारी ज्या दिवशी त्यांच्या मतदारसंघात मतदान करतील, त्यादिवसाची सुटी टाकू शकतील. त्याच दिवशी जबाबदारीवर असलेल्या मतदारसंघाचे मतदान नको, अशी अट घालण्यात आली आहे. ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. जिल्ह्यात एक लाख ३२ हजार ५३२ ज्येष्ठ नागरिक मतदार आहेत. (latest marathi news)

त्यांनाही पोस्टल अर्थात घरूनच मतदान करण्याची संधी उपलब्ध आहे. ४० टक्क्यांवरील दिव्यांगांना पोस्टलचा पर्याय मिळणार असून, त्यांची प्रथमत: संमती घेतली जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात मंगळवारी (ता. १९) प्रशिक्षण घेण्यात आले. मतदान केंद्र सहाय्यक (बीएलओ) हे पोस्टल मतदारांची माहिती संकलित करत आहेत. येत्या आठवड्यात जिल्ह्यातील पोस्टल मतदारांचा निश्‍चित आकडा समोर येण्याची शक्यता वर्तविली जाते.

''किती व्यक्तींना पोस्टल मतदान करायचे आहे, याविषयी बीएलओंकडून माहिती मागविली आहे. यात ४० टक्क्यांवरील दिव्यांग, ८० वर्षांवरील व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर निश्‍चितपणे संख्या लक्षात येईल.''- डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी (जिल्हा निवडणूक विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

SCROLL FOR NEXT