Nashik Police Election Duty esakal
नाशिक

Nashik Police Election Duty : पोलिसांवरील ताण झाला हलका! लोकसभा निवडणुकीच्या सततच्या बंदोबस्तामुळे होता तणाव

Lok Sabha Election 2024 : गेल्या महिनाभरापासून सतत बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Election Duty : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील नाशिक व दिंडोरी मतदार संघातील निवडणूकीसाठीचे मतदानाची प्रक्रिया कोणत्याप्रकारचे गालबोट न लागता निर्विघ्न पार पडली. यामुळे गेल्या महिनाभरापासून सतत बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. (Nashik police lok sabha Election 2024 Duty stress news)

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता.२०) मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. शहर आणि जिल्ह्यात कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. त्यामुळे गेल्या एक-दीड महिन्यापासून बंदोबस्ताच्या तणावात असलेल्या पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

गेल्या तीन आठवड्यांपासून शहर-जिल्ह्यात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांच्या प्रचारसभा पार पडल्या. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पिंपळगाव बसवंत याठिकाणी झाली. याशिवाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा शहर-जिल्ह्यात झाल्या. त्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता. तर शेवटच्या आठवड्यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याही सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या. परिणमी, शहर-जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (latest marathi news)

याशिवाय, गेल्या महिन्या राज्यभरात झालेल्या पहिल्या चार टप्प्यातील निवडणुकांसाठी शहर-जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी परजिल्ह्यांमध्ये बंदोबस्तासाठी गेले होते. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस अधिकाऱ्यापासून अंमलदारापर्यंत सर्वच बंदोबस्तासह नियमित सेवा बजावत असल्याने तणावात होते. मात्र, अखेर शहर-जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यामुळे पोलिस यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

आता मतमोजणीवर लक्ष

दरम्यान, येत्या ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन सुरू झालेले आहे. आगामी दोन आठवडे पोलिसांना फारसा बंदोबस्त नसला तरी मतमोजणीदरम्यान कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने पोलिस यंत्रणा सतर्क आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT