Lok Sabha Election 2024 esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election: निवडणूक संपली; आता चर्चा आघाडी, विजयाची! कोण येणार निवडून, यापेक्षा आघाडी किती मिळणार याला उधाण

Lok Sabha Election 2024 : विजयासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडून आकडेमोड केली जात असून गावातील पारावर, चौकाचौकात, चावडीवर आदी गर्दीच्या ठिकाणी कोण निवडून येणार? या चर्चेला आत्ता उधाण आले आहे.

रोशन भामरे

तळवाडे दिगर : लोकसभा निवडणुकीत नाशिक, धुळे, दिंडोरी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंद झाल्यानंतर या तिन्ही मतदानसंघात नेमके कोण विजयी होणार याची आकडेमोड सुरु झली आहे. शहरासह ग्रामीण भागातील गावागावांत विजयासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडून आकडेमोड केली जात असून गावातील पारावर, चौकाचौकात, चावडीवर आदी गर्दीच्या ठिकाणी कोण निवडून येणार? या चर्चेला आत्ता उधाण आले आहे. (Nashik Lok Sabha Election 2024 waiting constituency results)

धुळे लोकसभासंघात मागील पंचवार्षिकला भाजपचे डॉ. सुभाष भामरे हे निवडून आले होते. त्यांनी हा गड राखण्यासाठी सर्वतोपरी ताकद लावली. त्यांना कॉंग्रसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्या रूपाने एक तगडे आव्हान निर्माण झाले आहे. या विभागातून एकूण १८ उमेवारांनी उमेदवारी केली होती पण मात्र, खरी लढत ही भाजपा आणि कॉंग्रस या दोनच पक्षांच्या उमेदवारांमध्ये होती.

या निवडणुकीत चांगलाच रंग भरला तो कांद्याच्या विषयाने. केंद्र सरकारची कांद्याविषयक निती सतत बदलत होती. त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांसह व्यापारी घटकालाही बसला. त्यामुळे यंदाचया मतादनात त्याचे प्रतिबिंब उमटले. गत निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत काही ठिकाणी वाढ झाली. काही ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे आहे. त्यामुळे निकालाबाबत जनतेत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मतदानानंतर आता आता गावातील कट्ट्यावर, पारावर आणि चावडीवर, नेमके कोण विजयी होणार? याची आकडेमोड सुरु झाली. या मतदारसंघातून, तालुक्यातून, गावातून इतके मतदान झाले. या पक्षाला इतकी लीड मिळाली आहे. त्या भागात त्या पक्षाला लीड मिळेल अशा चर्चा चांगल्याच रंगत आहेत. कागदावर आकडेमोड करील आपलाच पक्ष विजयी होईल अशी आकडेमोड केलेली पोस्ट व्हायरल केली जात आहे. (latest marathi news)

आघाडीची सोयीची चर्चा

आज तरी ज्या मतदारांनी ज्या उमेदवारांना मतदान दिले आहे, अशा सर्वच मतदारांना आपलाच उमेदवार विजयी होईल अशी खात्री वाटते आहे. यासाठी पुढील पंधरा दिवसाच्या पुढील काळात अनेक जणांकडून विजयाच्या पैजा लागल्या जातील तर नवल वाटायला नको. त्यामुळे आता मतदानानंतर सर्वांच्या नजरा या निवडणुकीच्या निकालाकडे लागल्या आहेत.

आघाडी कुणाला मिळेल यावर प्रत्येकाची मते मात्र सोयीची आहेत. काही जण भाजपची आहेत, त्यांना साहजिकच भाजपलाच आघाडी मिळेल असे वाटते, त्याला लगेच दुसरा कॉंग्रेसचा छेद देत तुझी आकडेवारी कशी चुकीची आहे, यावेळी मोदीविरोधात लाटत होती हे आपल्यापरीने पटवून देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा विमानसेवेवर मोठा परिणाम; उड्डाणे आणि लँडिंग प्रक्रियेत अडथळे

SCROLL FOR NEXT