Rohit Pawar esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election 2024 : आमदार रोहित पवारांच्या मुक्कामाने महाविकास आघाडीत धडकी!

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे जळगावकडे जात असतानाच नाशिकमध्ये अचानक मुक्कामी थांबल्याने महाविकास आघाडीमध्ये धडकी भरली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे जळगावकडे जात असतानाच नाशिकमध्ये अचानक मुक्कामी थांबल्याने महाविकास आघाडीमध्ये धडकी भरली आहे. नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला सोडावी अशी मागणी राष्ट्रवादीमधून जोर धरू लागली आहे, त्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांचा मुक्काम महाविकास आघाडीत चर्चेला आला आहे. (Nashik lok sabha election 2024 MLA Rohit Pawar stay)

भारतीय जनता पक्षासाठी नाशिकची जागा सोडावी या मागणीसाठी पक्षाच्या कार्यालयात प्रथमच आंदोलन झाले. हे आंदोलन होत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने देखील नाशिकच्या जागेसाठी आग्रह धरला आहे. नाशिकची जागा महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची ताकददेखील असल्याने नाशिकची जागा या गटाकडे सोडावी यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आग्रही आहेत. आमदार पवार हे जळगावच्या चोपडा मतदारसंघाकडे जात असताना सोमवारी (ता.१८) त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक कार्यक्रमासाठी थांबले. त्यानंतर नाशिकमध्ये त्यांनी मुक्काम केला. (latest marathi news)

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी अशी मागणी केल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेससाठी नाशिक मतदारसंघ हा अनुकूल आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी नाशिकची जागा मागण्याची हिच वेळ असल्याचे त्यांच्याकडे मागणी करण्यात आल्याचे समजते. एकंदरीत आमदार पवार यांच्या नाशिक दौऱ्यामुळे महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये देखील आलबेल नसल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT