Former MLA Rajabhau Waje esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election 2024: राजाभाऊ वाजे 14 कोटी 80 लाखांचे धनी! 2019 च्या विधानसभेच्या तुलनेत जंगम मालमत्तेत दुपटीने वाढ

Political News : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज सादर केलेले पराग (राजाभाऊ) वाजे यांच्याकडे जंगम (चल) व स्थावर (अचल) अशी एकूण १४ कोटी ८० लाखांची संपत्ती आहे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज सादर केलेले पराग (राजाभाऊ) वाजे यांच्याकडे जंगम (चल) व स्थावर (अचल) अशी एकूण १४ कोटी ८० लाखांची संपत्ती आहे. विशेष म्हणजे यातील १३ कोटी २७ लाख ९१ हजारांची मालमत्ता ही त्यांची वडिलोपार्जित असून, राजाभाऊंनी स्वत: फक्त ३५ लाख रुपयांची संपत्ती गेल्या पाच वर्षांत खरेदी केली आहे. (Nashik Lok Sabha Election 2024) सद्यस्थितीला त्यांच्याकडे एक कोटी ५२ लाखांची जंगम मालमत्ता तर, ३५ लाखांची स्थावर मालमत्ता असल्याचे त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. (Nashik Lok Sabha Election 2024 Rajabhau Waje increase in property)

महाविकास आघाडीच्या नाशिक व दिंडोरीच्या उमेदवारांनी सोमवारी उमेदवारी अर्ज सादर केला. अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजेंनी एसबीआय व पतसंस्थेकडून १९ लाख १८ हजारांचे कर्ज घेतले आहे.

मात्र, २०१९ च्या सिन्नर विधानसभा निवडणुकीत त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे ७६ लाख सहा हजारांची जंगम मालमत्ता होती. पाच वर्षात यात दुपटीने वाढ होवून एक कोटी ५२ लाखांवर ही मालमत्ता पोहोचली आहे. स्थावर मालमत्तेचा विचार केला तर २०१९ मध्ये त्यांच्याकडे आठ कोटी ६७ लाख ६९ हजारांची मालमत्ता होती.

यात वडिलोपार्जित मालमत्तेचाही समावेश होता. वाजेंना वारसाने मिळालेल्या जमिनी, पेट्रोल पंपांच्या किमतीत वाढ झाल्याने एकूण १३ कोटी २८ लाखांवर पोहोचली आहे. राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था यांमध्ये १५ लाखांच्या जवळपास मुदतठेवी त्यांच्या नावे आहेत. तर दोन लाख ७१ हजारांचा वैयक्तिक विमाही त्यांनी उतरवला आहे.

बुलेट, टॅक्टर, ॲक्टिव्हा, स्कॉर्पिओ, होंडा सिटी, इनोव्हा अशा गाड्या त्यांच्याकडे असून, ५७ हजार ६०० रुपयांचे सोने त्यांच्याकडे आहे. पत्नीच्या नावे १६ लाख २० हजारांचे (२२५ ग्रॅम) सोने असून, पेट्रोलपंप व फामर्स प्रोड्युसर कंपनीही त्यांच्या नावे दिसते. अवघे ७० हजारांची रोख रक्कम राजाभाऊंकडे आहे. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात राजाभाऊंनी ३५ लाखांची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात जयश्री महेंद्र पाटील यांनी सैनिक समाज पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याकडे सहा लाख नऊ हजारांची जंगम मालमत्ता तर, सात लाख ५५ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या एकूण संपत्तीचे बाजार मूल्य ८४ लाख इतके असून त्यांच्या पतीच्या नावे ५७ लाखांची संपत्ती असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. (Latest Marathi News)

भास्कर भगरेंकडे ६५ लाखांची संपत्ती; १७ तोळे सोने

अनुसूचित जमातींसाठी राखीव दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्कर मुरलीधर भगरे यांनी महाविकास आघाडीकडून अर्ज सादर केला. अर्जासोबत त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे विवरण दिले आहे. त्यानुसार भास्कर भगरे यांच्याकडे चार तोळे व पत्नीच्या नावे १३ तोळे सोने एकूण १३ लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने आहेत.

तर ४३ लाख ७७ हजारांची जंगम (चल) मालमत्ता असून, २१ लाख ४१ हजारांची स्थावर (अचल) संपत्ती त्यांच्या नावावर आहे. अडीच लाख रुपये रोख असलेल्या भास्कर भगरे यांच्याकडे तीन गाड्या आहेत. तर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये दहा लाख ३८ हजारांच्या ठेवी असून, निफाड तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेतही सात लाखांची ठेवींद्वारे गुंतवणूक केली आहे.

सहा लाखांची एलआयसी पॉलिसी त्यांच्या नावे आहे. एवढ्या सगळ्या संपत्तीचे धनी असलेल्या भास्कर भगरेंच्या नावे २१ लाख १७ हजारांचे कर्जही आहे. पत्नीच्या नावेही सव्वा तीन लाखांचे कर्ज असल्याचे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सादर केले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असलेले भास्कर भगरे यांनी लोकसभेसाठी प्रथमच उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

ठळक घडामोडी

-राजाभाऊ वाजेंच्या जंगम मालमत्ता पाच वर्षात दुप्पट

-वाजेंकडे एकूण एक कोटी ५२ लाख ५८ हजारांची जंगम मालमत्ता

-वाजेंकडे वडिलोपार्जित १३ कोटी २७ लाख ९१ हजारांची संपत्ती

-बुलेट, टॅक्टर, ॲक्टिव्हा, स्कॉर्पिओ, होंडा सिटी, इनोव्हा कार

-५७ हजारांचे सहा ग्रॅम सोने, पत्नीकडे १६ लाखांचे २२५ ग्रॅम सोने

-वाजेंकडे रोख रक्क्म अवघे ७० हजार, भगरेंकडे अडीच लाख रोकड

-वाजेंकडे १५ लाखांच्या जवळपास ठेवी, भगरेंकडे १७ लाखांच्या ठेवी

-वाजेंवर १९ लाखांचे तर भगरेंवर २१ लाखांचे कर्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT