Victory procession of Rajabhau Waje. esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election 2024 Result : राजाभाऊ वाजेंची विजयी मिरवणूक

Nashik News : शहरातील पारंपरिक मिरवणूक मार्गावरून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.

सकाळ वृत्तेसवा

Nashik News : शहरातील पारंपरिक मिरवणूक मार्गावरून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. पक्ष कार्यालयपासून मिरवणुकीस प्रारंभ झाल्यानंतर खडकाळी, दूध बाजार फुले मार्केट कोकणीपुरा चौक येथे मुस्लिम बांधवांकडून वाजे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. (Nashik Lok Sabha Election 2024 Result)

नाशिक लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव केला. पूर्ण मतमोजणी झाल्यानंतर श्री. वाजे यांनी रात्री पारंपरिक मिरवणूक मार्गावरून विजयी मिरवणूक काढण्यात आली.

पहिल्यांदाच विजयी उमेदवारांनी जुने नाशिक परिसरात येऊन येथील नागरिकांची भेट घेत सत्कार स्वीकारला. मिरवणुकीत माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड यांच्यासह आदी ज्येष्ठ नेते आणि महिला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले. (latest marathi news)

धार्मिक एकतेचे दर्शन

राजाभाऊ वाजे यांची विजय मिरवणूक सुरू असताना खडकाळी परिसरात रात्रीच्या इशाची नमाज पठणाची वेळ झाली. अजान सुरू होताच श्री. वाजे यांच्या सूचनेवरून डीजे बंद करण्यात आला. सर्वजण कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी न देता पाच मिनिटांसाठी स्तब्ध राहिले. अजान संपताच पूर्वत मिरवणूक सुरू झाली.

दरम्यान मुस्लिम बहुल भागात मिरवणूक सुरू असताना सर्व मुस्लिम बांधवांचे आभार व्यक्त करत हिंदू मुस्लिम बांधव एकत्र असल्याची कवाली डीजेवर वाजवण्यात आली. यातून धार्मिक एकतेचे दर्शन घडून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT