Eknath Shinde & Hemant Godse esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये शिवसेनेचाच उमेदवार! खासदार गोडसे यांनीही थोपटले दंड

Political News : महायुतीच्या ट्रिपल इंजिनला चौथे इंजिन जोडलेल्या मनसेनेही नाशिकच्या जागेवर दावा केला आहे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या नाशिकच्या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाने आंदोलनाच्या माध्यमातून दावा केल्यानंतर खासदार गोडसे यांनी पुन्हा भुमिका स्पष्ट करीत नाशिकमध्ये शिवसेनेचाच उमेदवार लढेल असे स्पष्टीकरण देत दंड थोपटले आहेत. (Nashik Lok Sabha Election 2024)

खासदार गोडसे यांच्या या भूमिकेमुळे नाशिकच्या जागेचा वाद विकोपाला गेला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही नाशिकच्या जागेचा दावा केला जात आहे. महायुतीच्या ट्रिपल इंजिनला चौथे इंजिन जोडलेल्या मनसेनेही नाशिकच्या जागेवर दावा केला आहे. (Nashik Lok Sabha Election 2024 MP Godse marathi news)

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आला. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आल्यानंतर भाजपने देखील सोमवारी धुलीवंदनाचा मुहुर्त साधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

भाजपकडून आक्रमक भूमिका घेतली जाण्याच्या पार्श्‍वभूमीवर खासदार गोडसे यांनी पुन्हा नाशिकच्या जागेवर दावा केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, नाशिकची जागा परंपरेने शिवसेनेकडे आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवर भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेससह अन्य पक्षांकडूननही दावा केला जात आहे.

या पार्श्‍वभूमीवर नाशिकच्या शिवसैनिकांची प्रामाणिक इच्छा होती की, हक्काच्या जागेसाठी आपणदेखील मागणी करायला पाहिजे. शिवसैनिकांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या जिल्हास्तरीय नेत्यांच्या माध्यमातून पोहोचवाव्यात ही भावना आंदोलनामागे होती.

म्हणून रविवारी पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी व अन्य पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेलो. मुख्यमंत्र्यांना भावना कळविल्या. मुख्यमंत्र्यांनीदेखील महायुतीच्या राज्यस्तरीय बैठकीत शिवसैनिकांच्या भावना मांडल्या जातील व नाशिकची जागा ही शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी सोडण्यासाठी प्रयत्न होतील, असे सांगितले. (latest marathi news)

मनसेचे नाव टाळले

खासदार गोडसे यांनी महायुतीच्या सरकारमध्ये मनसेचे नाव घेणे टाळले. नाशिकच्या जागेवर भाजपसह राष्ट्रवादी कॉंग्रेस व इतर पक्ष असे संबोधून मनसेला साईड ट्रॅक केले. नाशिकमधून गोडसे मनसेच्या तिकीटावर सन २००९ मध्ये प्रथम उभे राहिले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य व नाशिक महापालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले. सन २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश करून सलग दोनदा खासदार म्हणून निवडून आले.

राष्ट्रवादी मैदानात

नाशिकच्या जागेवर महायुतीत पुर्वीपासूनच शिवसेनेचा दावा होताच आता भाजप व मनसेलादेखील नाशिकची जागा हवी आहे. त्यात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने उचल खाल्ली असून राज्य पातळीवर महायुतीत नाशिकची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT