Lok Sabha Election 2024  esakal
नाशिक

Lok Sabha Election 2024 : नाशिक मधील हजारो उत्तर भारतीय नागरीक मतदानासाठी रवाना

Lok Sabha Election : अंबड लिंक रोडवरील हजारो नागरीक हिंन्दी भाषिक नागरीक मतदानासाठी उत्तर भारतात रवाना झाल्याचे पाहायला मिळाले.

सतिश निकुंभ

सातपूर : लोकसभा निवडणूकीच्या पाचवा व सहाव्या टप्प्यातील निवडणूकीत बहुतांशी उत्तर भारतातील राज्यातील जागाचा समावेश आसल्याने नाशिक मधील सातपूर अंबड लिंक रोडवरील हजारो नागरीक हिंन्दी भाषिक नागरीक मतदानासाठी उत्तर भारतात रवाना झाल्याचे पाहायला मिळाले. (Thousands of North Indian citizens going for voting in city )

दरम्यान उत्तर भारतातील युपी, बिहार, झारखंड या राज्यातील बहुतांशी मुस्लिम व दलित मतदार संघातील नागरीक मोठ्या प्रमाणावर आपल्या पोटा पाण्यासाठी नाशिक मध्ये स्थिरावले आहेत यात सातपूर अंबड लिंक रोडवरील वरील भंगार बाझार व तसेच संजीव नगर, दत्त नगर, केवल पार्क, श्रमिकनगर, शिवाजी नगर तसेच औद्योगिक वसाहतीला लागून आसलेल्या झोपड पट्या मध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

मागील काही लोकसभा व या राज्याच्या विधानसभा निवडणूकीत उमेदवार थेट सातपूर अंबड लिंक रोड गाठून निवडणूकीचा प्रचार करताना या पुर्वी पाहायला मिळाले होते. यावेळी मात्र सभा न घेता निवडणूकी पुर्वी छोटे खाणी बैठका घेवून जास्तीत जास्त नागरीकांना मतदानासाठी घेवून जाण्याच नियोजन केले जात होते.

मुलांना शाळेला सुट्ट्या लागताच महीलांना आपल्या मुला बाळासह एक महिन्या पुर्वीच रेल्वेने व खाजगी वाहनाने रवाना केले आहेत. आता पाचव्या व सहाव्या टप्प्यातील मतदानासाठी पुरूष वर्गालाही रेल्वे, खाजगी वाहने तसेच विमान सेवेने रवाना झाले आहेत. सातपूर अंबड लिंक रोडवरील बहुतांशी व्यापारी उत्तर भारतातील अनेक जिल्हातील स्थानीक स्वराज्य संस्था मध्ये प्रदान नगरसेवकसह विविध पदांवरही विराजमान आहेत त्यामुळे नाशिक मध्ये व्यवसाय करत राजकारणात ही आपला दबदबा निर्माण केला आहे.

नाशिक मधील सातपूर अंबड लिंक रोडवरील विविध भागात ठरून वाढलेली लोकसंख्या पाहता येणारा काळात स्थानिक भुमीपुत्राना डावलून उत्तर भारतीय उमेदवार निवडूनन येईल अशी शक्यताही निर्माण झाली आहे.

या पूर्वी सातपूर अंबड लिंक रोडवर युपी बिहारचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव, आझम गडचे खान, जगजबीका पाल, कृपा शंकर सिंग त्रिपाठी तसेच कुख्यात डाॅन मुक्ततार अन्सारी, अतीक अहमद यांच्या नातेवाईकांनी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकासाठी प्रचार सभा घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nurse Strike: राज्यातील परिचारिकांचा संप, मागण्या मान्य न झाल्यास 'या' तारखेपासून राज्यव्यापी निषेधाची घोषणा, आरोग्य सेवा ठप्प होणार?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी अर्धा तास उशिराची मुभा; सरकारचा निर्णय, कारण काय?

अन् अर्जुनचा साक्षीला चेकमेट! कोर्टात दाखवला 'तो' पुरावा'; सगळेच शॉक, 'ठरलं तर मग'चा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

Eknath Shinde : राजकीय समीकरणे बदलणार? येवला तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व वाढतेय

Government Scheme: मुलांच्या पालनपोषणासाठी मिळणार ४००० रुपये, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू, अर्ज कसा करायचा?

SCROLL FOR NEXT