bhaskar bhagare & rajabhau Waje esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election 2024 Vote Counting: नाशिक, दिंडोरीत महाविकास आघाडीची आघाडी!

Lok Sabha Election 2024 : दिंडोरी मतदारसंघात डमी अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांनी जोरदार मुसंडी मारत बाराव्या फेरीअखेर ५३ हजार मते मिळवित महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना घाम फोडला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election 2024 Vote Counting : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत दोन्ही जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी दहाव्या फेरीपर्यंत कायम होती. दिंडोरी मतदारसंघात डमी अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांनी जोरदार मुसंडी मारत बाराव्या फेरीअखेर ५३ हजार मते मिळवित महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना घाम फोडला. (Nashik Lok Sabha Election 2024 Vote Counting Mahavikas Aghadi lead in city Dindori marathi news)

नाशिक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी १४ व्या फेरीअखेर १ लाख ४७ हजार १२ मतांची आघाडी घेतली आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे ४० हजार ४० मतांची आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीपासून या दोन्ही उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.

त्यामुळे या निवडणुकीत ही आघाडी अशीच कायम राहिली तर नाशिक जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसणार आहे. नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तर दिंडोरीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजून निकाल जाहीर व्हायला काही अवधी असला, तरी तत्पूर्वीच महाविकास आघाडीच्या समर्थक, कार्यकर्ते यांनी जल्लोषास प्रारंभ केला आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रात ३ महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं, सरकार काय करते? राहुल गांधी आक्रमक!

नवी सुरुवात ! तेजश्रीच्या मालिकेचं शूटिंग सुरु की नव्या प्रोजेक्टची नांदी ?फोटो आले चर्चेत

Delhi Fuel Ban : जुने वाहन? इंधन नकोच! आजपासून दिल्लीतील पेट्रोल पंपांवर कडक अंमलबजावणी सुरू

BCG Report: पुढील 15 वर्षांत 'हे' क्षेत्र बनणार पैसे छापण्याची मशीन; मध्यमवर्ग असणार गेम चेंजर

Kolhapur : उच्चशिक्षित स्वप्नजाचं मामेभावाशीच लग्न, किरकोळ वादानंतर माहेरी गेली अन्; उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT