Speaking at a press conference, former Shiv Sena Thackeray faction chief Vijay Karanjkar. Former MLA Yogesh Gholap etc. esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : मी लढणार म्हणजे लढणारच अन् पाडणारही; नाराज करंजकर यांचे बंडखोरीचे संकेत

Lok Sabha Election : आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या ‘उबाठा’ गटामध्ये इच्छुक व माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी बंडखोरीचे संकेत दिले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या ‘उबाठा’ गटामध्ये इच्छुक व माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी बंडखोरीचे संकेत दिले. निवडणूक लढणार म्हणजे लढणारच अन् विरोधकाला पाडणारही, अशी घोषणा एकीकडे करताना दुसरीकडे दोन दिवसांत या संदर्भात निर्णय जाहीर करण्याचे सांगून त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच अल्टिमेटम दिला. (Nashik Lok Sabha Election Angry Karanjkar signal of rebellion I will fight marathi news)

महाविकास आघाडीतील शिवसेनेतर्फे १६ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आली. त्यात नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांच्या नावाचा समावेश आहे. ही यादी जाहीर होताच इच्छुक विजय करंजकर यांनी भूमिका जाहीर केली. मी निवडणूक लढणार म्हणजे लढणारच व पाडणारही, असे त्यांनी सांगितले. मात्र प्रतिस्पर्धी कोण, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. मात्र निवडणुकीला शंभर टक्के उभे राहणार, असे स्पष्ट केले. यावरून करंजकर हे बंडखोरी करणार असल्याचे स्पष्ट होते.

कुणाचा हात, तर कुणाचा पाय!

करंजकर गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील सिन्नर व इगतपुरी, तसेच शहरातील काही भागात प्रचारार्थ ते पोचले. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी देखील महाविकास आघाडीकडून विजय करंजकर हेच उमेदवार असतील, असे अनेकदा जाहीर केले आहे. परंतु उमेदवारांच्या यादीत नाशिकमधून वाजे यांचे नाव जाहीर झाल्याने करंजकर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

करंजकर यांचा पत्ता कट करण्यात राऊत यांचा हात आहे का? या प्रश्‍नाला सरळ उत्तर देणे त्यांनी टाळले. ‘उमेदवारी कट होण्यामागे कोणाचा हात होता, कोणाचा पाय’, असे उपरोधिक स्पष्टीकरण देऊन संतापाची तीव्रता स्पष्ट केली. दोन दिवसांत स्पष्टपणे भूमिका घेणार असल्याचे सांगून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच त्यांनी अल्टिमेटम दिल्याचे मानले जात आहे.  (latest marathi news)

कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

विजय करंजकर एकीकडे माध्यमांशी संवाद साधत असताना दुसरीकडे मात्र करंजकर यांच्या कार्यकर्त्यांकडून, ‘खासदार कैसा हो, विजय आप्पा जैसा हो’, ‘उद्धव ठाकरे शब्द पाळा’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. यावर बोलताना करंजकर यांनी उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. त्यांची जेवढी शिवसेनेवर निष्ठा आहे, तेवढीच माझीदेखील आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

माजी आमदार घोलप सोबतीला

नाराज झालेल्या करंजकर यांच्याकडून माध्यमांशी संवाद साधण्यात आला, त्या वेळी त्यांच्यासोबत देवळालीचे माजी आमदार योगेश घोलप हेदेखील होते. काही महिन्यांपूर्वी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्यानंतर शिर्डीचे संपर्कनेते व माजी मंत्री बबन घोलप यांनी पदाचा राजीनामा दिला.

घोलप यांच्या बाबतीत जसे घडले, तीच स्थिती विजय करंजकर यांच्याबाबतीत घडून आल्याने माजी आमदार योगेश घोलप हे करंजकर यांच्यासोबत होते. त्यामुळे बंडखोरांचा स्वतंत्र गट शिवसेनेच्या ‘उबाठा’ गटामध्ये तयार होत असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT