Hemant Godse esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी; आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

Lok Sabha Election : नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा उमेदवार कोण याबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळताना दिसत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा उमेदवार कोण याबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळताना दिसत आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचे नाव भाजपकडून घोषित केल्यानंतर नाशिकमधून शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ( Hemant Godse is nominated from Nashik marathi news)

नाशिक लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये जागा कोणाला द्यायची याबद्दल तिढा निर्माण झाला होता. भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपकडून जागेची मागणी करण्यात आली. मात्र गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचाच खासदार असल्याने शिंदे गटाकडून दावा करण्यात आला होता.

१२ मार्चला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीदेखील शिवसेनेच्या संवाद मेळाव्यामध्ये विद्यमान खासदार गोडसे यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार असल्याने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवर दावा केला. (latest marathi news)

त्यानंतर नाशिकमधून भुजबळ हेच उमेदवार असतील अशी चर्चाही सुरू झाली. मात्र अद्यापपर्यंत घोषणा झाली नव्हती. राज्यात नऊ जागांसंदर्भात तिढा होता. साताऱ्याच्या जागेवर उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर झाल्यानंतर नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे जाईल असे बोलले गेले .

परंतु आज रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचे नाव घोषित झाल्यानंतर शिवसेनेकडून नाशिकच्या जागेचा आग्रह धरला गेला. त्यातून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोडसे यांचे नाव अधिकृतपणे शुक्रवारी घोषित होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : 'एल निनो'मुळे देशात 1972 आणि 2009 सारखा दुष्काळ पडणार? पुढील काही आठवडे का आहेत अत्यंत महत्त्वाचे, मान्सून कधी होणार पुन्हा सक्रिय?

सावध व्हा ! तुम्ही खात असलेला खवा शुद्ध की सिंथेटिक? घरबसल्या करा 'ही' चाचणी

Nanded MLC Election Result : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची बंडखोरी; विधानपरिषदेत पराभव होताच कृष्णा पाटील यांचीही ठाकरे गटातून हकालपट्टी

Amravati: भाजप च्या प्रवीण पोटे चा विजय

Latest Marathi News Live Update : भाजपकडून शिंदे गटाचा विश्वासघात..? जळगावमध्ये साथ देऊनही नाशिकमध्ये दगाफटका?

SCROLL FOR NEXT