Lok Sabha Election 2024 esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : आचारसंहितेचा धसका अंमलबजावणी सुरु

Lok Sabha Election : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने आचारसंहिता केल्यानंतर प्रशासनाकडून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने आचारसंहिता केल्यानंतर प्रशासनाकडून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. तसेच राजकीय नेते, इच्छुक उमेदवार यांनीही या आचारसंहितेचा धसका घेत जपून पावले उचलली जात आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच महानगरपालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. (Nashik Lok Sabha Election Implementation of code of conduct marathi news)

मनपा क्षेत्राचे सर्व प्रमुख रस्ते, चौक व विविध भागातील बॅनर, झेंडे, फ्लेक्स जमा करण्यात आले आहेत. विविध विकासकामांच्या कोनशिला, कमानी, राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे झाकण्यात आली आहेत. पालिका प्रशासनाकडून विविध विभागप्रमुखांना आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या आहेत. मनपा आयुक्तांकडून आढावा बैठका घेतल्या जात आहेत.  (latest marathi news)

शहरातील सर्व राजकीय पक्ष, पक्षाचे नेते, विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे आदर्श आचारसंहितेचे पालन करुन हा निवडणुकीचा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा, असे आवाहन केले जात आहे. तसेच ‘आचारसंहिता नियंत्रण कक्ष’ स्थापन करण्यात आला असून सदर कक्ष २४ तास सुरु असणार आहे.

दैनंदिन खर्चाची नोंद

लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक संपल्यानंतर खर्च सादर करणे बंधनकारक असते. त्यामुळे प्रत्येक उमेदवार निवडणूक काळात प्रचारासाठी ज्या वाहनांचा वापर करतील, जो काही खर्च करतील त्या खर्चाची नोंद तारखेनिहाय करावी लागणार आहे.त्यामुळे प्रत्येक उमेदवारांकडून काळजी घेतली जात आहे. निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींकडून प्रत्येक मतदारसंघावर बारकाईने लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT