Vidhan Sabha Election
Vidhan Sabha Election esakal
नाशिक

Nashik Vidhan Sabha Election : दिंडोरीत निवडणूक लोकसभेची, निफाडमध्ये तालिम विधानसभेची! नेते लागले कामाला

सकाळ वृत्तसेवा

एस.डी.अहिरे : सकाळ वृत्तसेवा,

पिंपळगांव बसवंत : लोकसभा निवडणुकीचा आखाडा गजबजू लागला असून आगामी विधानसभेसाठी इच्छुकांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. जो लोकसभेला ताकद दाखवेल त्याची विधानसभेची दावेदारी अधिक मजबुत होणार आहे.

त्यामुळे विद्यमान आणि इच्छुक सगळेच गट बांधणीसह आपल्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहेत. निफाड मतदारसंघात हे चित्र अधिकच गडद जाणवते आहे. लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेची पेरणी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे लोकसभा ही विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे. (Nashik Lok Sabha election in Dindori \Vidhan Sabha election in Niphad)

दिंडोरी लोकसभेत समाविष्ट असलेल्या निफाड मतदारसंघात आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम हे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत रिंगणात दिसण्याची चिन्हे आहेत. मागील निवडणूकीप्रमाणेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी पाऊल टाकले तर चौरंगी लढत नाकारता येत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघ, गट, गण, प्रभाव क्षेत्रातील कामगिरीची दखल घेतली जाणार आहे. त्यामुळे विधानसभाच नव्हे; तर जिल्हा परिषद, पंचायत समितीला उमेदवारी मागू इच्छिणाऱ्यांना कंबर कसावी लागेल. विशेषत: पुढील दीड महिन्यात भावी आमदार आपली ताकद आजमावताना दिसणार आहेत.

महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांची दिल्लीवारी निश्‍चित करून विधानसभा सुरक्षित करण्यासाठी दोन्ही आघाड्यांचे इच्छुक प्रयत्न करतील. यात मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, सुहास कांदे, डॉ.राहुल आहेर यासह माजी आमदार अनिल कदम, शिरीष कोतवाल, जे.पी.गावित,अमृता पवार यांचा समावेश आहे.दिंडोरी लोकसभेची निवडणुक या सर्वांची प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरणार आहे.  (latest marathi news)

निफाड मध्ये रंगले सोशल वॉर...

निवडणूक लोकसभेची असली तरी संवेदनशील राजकारण असलेल्या निफाडमध्ये राजकीय वातावरण ढवळुन निघाले आहे. सोशल मिडियावर कार्यकर्त्यामध्ये पक्षांविषयी आणि आपल्या नेत्यांविषयी मत-मतांतरे सुरू झाली आहेत. त्याचा प्रत्यय येत असून निफाडमध्ये सोशल वॉर रंगात आले आहे.

आमदार दिलीप बनकर यांचे समर्थक मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामाचे रिल्स बनवित आहेत. तर माजी आमदार अनिल कदम यांच्या वक्तृत्व व कर्तृत्व दाखविणाऱ्या चित्रफीती शिवसैनिकांकडून व्हायरल केल्या जात आहेत. यातून येणाऱ्या प्रतिसादामुळे शाब्दीक चकमकी झडत आहेत.

परस्परांना आव्हान, प्रतिआव्हान देणाऱ्या रिल्सचा भडिमार सध्या सुरू आहे. समाजमाध्यमावरील वातावरण तापले आहे. सोशल मिडियावर हा कोल्ड वॉरमुळे सर्वसामान्यांची करमणूक होत आहे. यतीन कदम हे सोशल मिडीयापासून चार हात लांब असुन होम टु होम जाऊन थेट भेट घेण्यावर त्यांनी भर दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT