Lok Sabha Election
Lok Sabha Election esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : अपक्षांची तुतारी ‘राष्ट्रवादी’साठी अडचणीची

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ‘तुतारी फुंकणारा मनुष्य’ या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवत असताना ‘तुतारी’ हे नामसाधर्म्य असलेले चिन्ह अपक्षांना मिळणार असल्याने त्यावरून नवीन वाद निर्माण झाला. अपक्षांची ‘तुतारी’ राष्ट्रवादीला अडचणीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाकडे गेले. ( controversy has arisen as independents will get symbol Tutari )

त्यामुळे शरद पवार गटाला तुतारी फुंकणारा मनुष्य हे निवडणूक चिन्ह मिळाले असून, त्यावर लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार गट)चा उमेदवार असल्याने त्यांना या चिन्हाचा वापर करावा लागेल. परंतु, निवडणूक आयोगाने अकरा प्रमुख राजकीय पक्षांसाठी चिन्ह निश्‍चित करून दिले आहे. सोबतच अपक्ष उमेदवारांसाठी १९० वेगवेगळे चिन्ह जिल्हा निवडणूक विभागाला दिले. अपक्ष उमेदवारांनी मागणी केल्यावर त्यातून एक चिन्ह देण्यात येते. (latest marathi news)

निवडणूक आयोगाच्या यादीत १७४ क्रमांकावर तुतारी हे चिन्ह आहे. त्याचे मराठी भाषांतर हे तुतारी करण्यात आले आहे. प्रत्यक्षात दोन्ही चिन्हांमध्ये कुठेही साधर्म्य दिसून येत नाही; पण ‘तुतारी’ या एका शब्दावरच राष्ट्रवादीने आक्षेप घेतला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातही यासंदर्भात वाद निर्माण होऊ शकतो. त्यादृष्टीने जिल्हा निवडणूक विभाग सतर्क झाला असून, मराठीसह ‘हिंदी’तील शब्दही कसा वापरता येईल, यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

''चिन्हवाटपाच्या वेळी उमेदवाराकडून चिन्हाची मागणी झाल्यास याविषयी विचार करण्यात येईल. चिन्ह एकसारखी नसून, मराठी नावे सारखी आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात येईल.''- डॉ. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT