nashik Lok Sabha Election esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : पक्षीय उमेदवाराला एकच, अपक्षांना हवे 10 सूचक; निवडणूक नियमावली

Lok Sabha Election : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल ते ३ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल ते ३ मे या कालावधीत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांना अर्ज भरताना एकच सूचक लागेल. तर अपक्षांना दहा सुचकांची स्वाक्षरी आपल्या अर्जासोबत द्यावी लागणार आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ जोडणे आवश्‍यक असते. हा अर्ज नसेल, तर तो उमेदवारही अपक्ष गणला जातो. (Nashik Lok Sabha Election Party candidates need one independents marathi news)

त्यामुळे एबी फॉर्मला राजकारणात फार ‘किंमत’ आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी तीनपर्यंतच एबी फॉर्म सादर करण्याची मुदत संभाव्य उमेदवारांना देण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली.

हा रकाना कोरा सोडला, तर अर्ज होईल बाद

उमेदवारी अर्ज दाखल करताना नामनिर्देशन पत्र विहित नमुना '2A' भरायचा आहे. त्यासोबत शपथपत्र नमुना २६ प्रथम वर्ग दंडाधिकारी, नोटरी यांचे समक्ष स्वाक्षरी करून सादर करावा लागतो. या शपथपत्रातील सर्व रकाणे भरणे आवश्यक असून, एखादी बाब लागू नसेल तर 'निरंक' किंवा 'लागू नाही' असा तपशील नोंदविणे आवश्यक आहे, असे न केल्यास नामनिर्देशन पत्र छाननीचे वेळी अवैध ठरविले जाऊ शकते. (latest marathi news)

कोण होऊ शकतो उमेदवार

-पंचवीस वर्षांवरील कोणतीही व्यक्ती लोकसभा निवडणूक लढवू शकते

-महाराष्ट्राच्या कुठल्याही मतदारसंघातील मतदान यादीत नाव असायला हवे

-एकावेळी दोन मतदारसंघांत अर्ज सादर करता येईल

-सर्वसाधारण उमेदवारांना २५ हजार, तर एससी, एसटी या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना साडेबारा हजार रुपये अनामत रक्कम

-एक इच्छुक चार अर्ज सादर करू शकतो

-फौजदारी प्रकरणांबाबत उमेदवारांना वृत्तपत्रात, वृत्तवाहिनीवर तीनवेळा माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक

-प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची ९५ लाखांची मर्यादा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

SCROLL FOR NEXT