In a meeting organized by Akhil Bharatiya Mahatma Phule Samata Parishad, OBC leader Chhagan Bhujbal raised his hand and raised a unilateral demand regarding the withdrawal of the decision of not contesting the Nashik Lok Sabha elections.
In a meeting organized by Akhil Bharatiya Mahatma Phule Samata Parishad, OBC leader Chhagan Bhujbal raised his hand and raised a unilateral demand regarding the withdrawal of the decision of not contesting the Nashik Lok Sabha elections. esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक लढण्यासाठी भुजबळांवर दबाव; निर्णय मागे घेण्याची एकमुखी मागणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा करणाऱ्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी दबाव वाढला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढण्याचा निर्णय मागे घ्यावा, तसेच उमेदवारी संदर्भात भुजबळ जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील, असा ठराव बैठकीत करण्यात आला. (Nashik Lok Sabha Election Pressure on Bhujbal to contest Lok Sabha election )

त्याचबरोबर विदर्भ ब्राह्मण विकास मंचाच्या वतीने भुजबळ यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर करणारे पत्र सादर करण्यात आले. नाशिक दौऱ्यावर असल्याने भुजबळ फार्म येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली. या वेळी पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी धरला़; परंतु नावाची घोषणा केली जात नव्हती.

उमेदवारी जाहीर न झाल्याने भुजबळ यांनी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळे भुजबळ यांनी पुनर्विचार करून माघारीचा निर्णय मागे घ्यावा, नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली. भुजबळ जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असल्याचा ठराव संमत करण्यात आला. (Nashik Political News)

ओबीसी नेतृत्वाची दखल घेऊन मोदी, शहा यांनी भुजबळ यांनीच निवडणूक लढण्यास आग्रह धरला. ही बाब समता परिषदेसाठी अभिमानाची आहे. नाशिकच्या विकासासाठी व ओबीसींच्या न्याय हक्कासाठी भुजबळ यांची दिल्लीत आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांचे नेतृत्व हे दिल्लीत असावे, असे मत मांडले गेले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, शहराध्यक्ष कविता कर्डक, महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, महिला शहराध्यक्ष आशा भंदुरे, अंबादास खैरे, योगेश निसाळ, संतोष खैरनार, दिलीप तुपे, ज्ञानेश्वर महाजन, नाना पवार, शिवा काळे, ज्ञानेश्वर शेवाळे, नितीन गायकवाड, रूपेश जोशी, अमोल नाईक, सुनील पैठणकर, प्रशांत लोहार, राजेंद्र जगझाप, किशोरी खैरनार, मेघा दराडे, मीनाक्षी काकळीज आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT