Vote Counting  esakal
नाशिक

Vote Counting : मतमोजणीसाठी पोलिसांकडून आढावा सुरू; 4 जूनला मतमोजणी

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या मंगळवारी (ता. ४) मतमोजणी होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या मंगळवारी (ता. ४) मतमोजणी होणार आहे. या वेळी उमेदवारांसह समर्थकांची गर्दी होण्याची शक्यता आणि त्यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाकडून कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन सुरू आहे. (lok sabha election Review by police for counting of votes)

येत्या ४ जूनला नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अंबड औद्योगिक वसाहतीतील वेअर हाउस येथे होणार आहे. त्याचठिकाणी स्ट्राँग रूममध्ये दोन्ही मतदार संघाच्या मतपेट्या अर्थात, ईव्हीएम मशिन ठेवण्यात आलेले आहेत. येथे ‘सीआरपीएफ’च्या दोन, तर ‘एसआरपीएफ’च्या दोन तुकड्यांचा सशस्त्र बंदोबस्त आहे.

तर बाहेरील बंदोबस्ताची जबाबदारी शहर पोलिसांवर आहे. मतमोजणीच्या दृष्टिकोनातून याठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाकडून ओळखपत्र देण्यात आलेल्यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तरीही याठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे.

त्यासाठी वेअर हाउस परिसरातील सुमारे ५०० मीटरचा परिसर सर्वसामान्यांसाठी बंद केला जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून नियोजन सुरू आहे. तसेच वेअर हाउसकडे जाणाऱ्या रस्त्यांची नाकाबंदी करण्यात येऊन वाहनांना प्रवेश बंद केला जाणार आहे. कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचा अतिरिक्त भार असलेले उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. (latest marathi news)

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २० मेस शहर-जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया पार पाडली. किरकोळ प्रकार वगळता तळपत्या उन्हात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच, दोन्ही लोकसभा मतदार संघांमध्ये अटीतटीच्या लढती रंगल्या आहेत. नाशिकमध्ये तिरंगी, तर दिंडोरीत दुरंगी लढत होती. त्यामुळे उमेदवारांसह समर्थकांची उत्सुकताही शिगेला पोचली आहे.

- ४ जूनला वेअर हाउस येथे मतमोजणी

- ओळखपत्र प्रदान केलेल्यांना प्रवेश

- ५०० मीटरचा परिसर सील

- वाहनांना प्रवेशबंदी; पर्यायी मार्गांचा वापर

- कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन अंतिम टप्प्यात

"मतमोजणी केंद्रावरील पोलिस बंदोबस्ताचे नियोजन सुरू आहे. त्यासंदर्भात आढावा घेऊन अंतिम कडेकोट बंदोबस्त लावण्यात येईल." - चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा तथा मुख्यालय, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बसची एकमेकांना धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

Tukaram Munde news: मुंढेंचा दणका, अकोल्यात गुटख्याचा कारखाना उद्धवस्त..50 लाखांचा माल जप्त..

SCROLL FOR NEXT