Chhagan Bhujbal, Ajay Boraste, Adv. Rahul dhikale esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांसाठी भाजपाचा रेटा; प्रत्यक्षात तिसऱ्याच उमेदवाराच्या माथी फेटा?

Lok Sabha Election : नाशिक लोकसभेचा पेच काही केल्या सुटण्याची चिन्हे दिसत नसताना आता शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तिसऱ्या नवीन चेहऱ्याचा शोध सुरु केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभेचा पेच काही केल्या सुटण्याची चिन्हे दिसत नसताना आता शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तिसऱ्या नवीन चेहऱ्याचा शोध सुरु केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सर्वांना चालेल आणि निवडून येण्याची खात्री असलेल्या उमेदवाराच्या नावावर नव्याने विचार सुरु झाला आहे. त्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि भाजपाचे आमदार अॅड. राहुल ढिकले यांची नावे प्रामुख्याने चाचपडून पाहिली जात आहेत. (nashik lok sabha election Senior leaders of Shiv Sena Shinde faction and Bharatiya Janata Party )

राज्यातील मातब्बर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उमेदवारी संदर्भात स्पष्ट आदेश असूनही अजूनही त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या नावाचा शोध आता सुरु झाला आहे. महाराष्ट्रात 'मा.ध.व.' फॉर्म्युल्याचा विचार भारतीय जनता पक्षाने निश्चित केला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्यावर भाजपाने शिक्कामोर्तब केले.

या श्रेणीतील महत्त्वाचे नाव म्हणजे छगन भुजबळ. मात्र, जेव्हापासून भुजबळ यांचे नाव चर्चेत आले तेव्हापासून त्यांच्या समर्थनार्थ जसे काही समाज गट पुढे येत आहेत, तसाच त्यांच्या नावाला विरोध देखील वाढत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर 'निवडून येणाची क्षमता असलेल्या मराठा उमेदवाराला' मराठा मतदारांनी साथ दिली, आणि त्यास मुस्लिम मतांची जोड मिळाली, तर भुजबळांची वाटचाल बिकट बनू शकते.

या शक्यतांवरील विचारमंथनामुळे भुजबळ यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे काही नव्या पर्यायांवर महायुतीत विचारमंथन सुरु झाले आहे. त्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि भाजपाचे आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्या नावांचा प्रामुख्याने समावेश आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा जातीय मतांच्या ध्रृवीकरणासाठी ओळखला जातो.  (latest marathi news)

त्यामुळे 'हवापालट' झाल्यास महायुतीच्या उमेदवारासमोरील अडचणी वाढू शकतात, हे जोखून आता नव्या नावांचा विचार महायुतीच्या गोटात सुरु झाला आहे. अजय बोरस्ते हे भाजपा आणि संघ परिवार या दोन्हींना चालणारे आहेत. तर अॅड. राहुल ढिकले हे भाजपाचा शहरातील चेहरा आहेत. वादग्रस्त नसलेल्या या दोन्ही नेत्यांबाबत मतदारसंघात सध्या चाचपणी सुरु झालेली आहे.

शिंदे गटाकडेच जागा राहिल्यास अजय बोरस्ते यांच्या नावाचा तर भाजपाच्या खात्यात जागा गेल्यास अॅड. राहुल ढिकले यांचे नाव अग्रस्थानी आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा युवा नेते श्रीकांत शिंदे यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले. गोडसे यांच्या संदर्भातील नाराजी ही सर्वस्तरांत आहे. या नाराजीचे भांडवल करुन भाजपाने ही जागा मागण्यासाठी आग्रही भूमिका घेतली.

गोडसे यांनीही शक्तीप्रदर्शन करत आग्रह सुरुच ठेवला. एवढ्यावर गोडसे थांबले नाहीत, तर त्यांनी प्रचाराचा देखील शुभारंभ करुन टाकला. मात्र, भाजपा, शिवसेनेतील या वादात छगन भुजबळ यांच्यासाठी भाजपाचे दिल्लीतील वरिष्ठ नेते आग्रही झाले, आणि त्यांचे नाव जवळपास निश्चित झाले. आता भुजबळांच्या नावाची केवळ घोषणा उरलेली असताना तिसऱ्या नावांवर चर्चा सुरु झाल्याने उमेदवार निश्चितीसाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT