Police have planned strict security in the commissionerate area esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त! काही ठिकाणी मोबाईलमुळे प्रवेश नाकारला

Lok Sabha Election : नाशिक मतदार संघात सोमवारी (ता.२०) सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक मतदार संघात सोमवारी (ता.२०) सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आलेली असल्याने शहरातील बहुतांशी केंद्रावर पोलिसांनी मोबाईलसह मतदारांना प्रवेश नाकारला. त्यामुळे काही ठिकाणी वादावादी झाली. तर, काही ठिकाणी पोलिसांनी मतदारांना त्यांच्याकडील मोबाईल ‘स्वीचऑफ’ केल्यानंतर मतदानासाठी प्रवेश दिला. (Tighten security of police at polling stations)

दरम्यान, पोलिसांनी आयुक्तालय हद्दीतील नियोजनबद्ध कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून प्रारंभ झाला. शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील जवळपास सर्वच मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त सज्ज होता. तसेच, मतदानासाठी सकाळी सात वाजेपासून मतदारांनी मतदानासाठी केंद्र गाठल्याचे दिसून आले.

काही वेळात मात्र प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी झाली. अकराच्या सुमारास जवळपास सर्वच मतदान केंद्रांवरती मतदारांचा रांगा लागलेल्या होत्या. दरम्यान, पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालय हद्दीतील मतदान केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त लावलेला आहे. तर चौकाचौकात सशस्त्र पोलिसांच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.

आयुक्तालय हद्दीतील सर्वाधिक जास्त मतदान बुथ असलेल्या सिडकोतील माऊली लॉन्स परिसरातील डॉ विखे पाटील मेमोरियल स्कुलला पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भेट देत पाहणी केली. त्यानंतर ते सिडको, सातपूर परिसरातील मतदान केंद्रांची प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.

मतदारांच्या रांगा

सिडको परिसरातील मतदार केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दुपारी बाराच्या कडक उन्हातही नागरिक उत्साहाने मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. ज्येष्ठ नागरिक, तरुणांसह महिलांमध्येही उत्साह दिसून आला.  तसेच, भरारी पथकामार्फत मतदान केंद्रांना भेटी देत पाहणी केली जात होती. सेक्टर अधिकार्यांकडून सतत गस्त घातली जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT