magnet man child esakal
नाशिक

वडिलांना लस घेऊन, तर मुलाला लसविनाच चिकटल्या लोखंडी वस्तू!

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : दोन दिवसांपूर्वीच अरविंद जगताप (वय ७१) या ज्येष्ठ नागरिकाच्या शरीरावर स्टीलच्या, लोखंडी वस्तू चिकटत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर दुसरा मॅग्नेट मॅन काल (ता.११) पाहायला मिळाला. त्यावेळी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती, त्यानंतर आता त्यांच्या मुलाला सुध्दा स्टील अन् लोखंडी वस्तू चिटकत असल्याचा प्रकार उघडकीस आला. (nashik-magnet-man-child-story-marathi-news)

लस घेतल्यामुळे हा प्रकार होत असल्याचा दावा ठरतोय फोल

अंबड येथील महालक्ष्मीनगर भागातील कंपनी मालक व निमाचे सदस्य नानासाहेब देवरे यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा दिनेश देवरे (वय ११) याच्या शरीरावर लोखंडी वस्तू चिटकत असल्याचे परिसरातील नागरिकांना बघायला मिळाले. नानासाहेब देवरे यांनी दोन महिन्यांपूर्वी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मात्र, त्यांचा मुलगा दिनेश याने लसीचा डोस घेतला नसतानाही त्याच्या अंगावरही स्टीलचे चमचे, कॉइन, लोखंडी वस्तू चिटकत असल्याचे आढळून आले. यामुळे ज्या व्यक्तींनी लस घेतलेली नाही, अशा व्यक्तींच्या शरीरावरही स्टीलचे चमचे, कॉइन व लोखंडी वस्तू चिटकत असल्याने लस घेतल्यामुळे हा प्रकार होत असल्याचा दावा आता यानिमित्त फोल ठरला आहे.

अंनिस कडून प्रकाराची पोलखोल

अंनिसचे कार्यकर्ते अण्णा कडलासकर यांनी नाशिकमधील या 'चुंबकत्व दाव्या'चा फोलपणा सिद्ध केला आहे. त्यांनी केलेल्या खुलाशानुसार, खरे तर हा प्रयोग कोणीही माणूस करून पाहू शकतो. नाणे, उलथन जरासे ओले करून घ्या आणि पोट, दंड, पाठ अशा सपाट भागावर हलकेसे दाबून ठेवा. निर्वात पोकळी निर्माण होऊन जरावेळ अशी वस्तू चिकटून राहते. पाणी सुकले की मात्र पडते हमखास! ही बातमी समोर येताच स्वतः प्रयोग केला. आणि अशा अवैज्ञानिक दाव्याची पोलखोल केली. जगात असे चुंबकत्व कोणाच्याही अंगात येऊ शकत नाही! असा दावा अंनिसने केला आहे. सोबतच याचा व्हिडीओ देखील अंनिसकडून प्रसारित करण्यात आला आहे. अण्णा कडलास्कर यांनी देखील अरंविद सोनार यांच्याप्रमाणेच लोखंडी वस्तू स्वत:च्या शरिराला चिकटवून दाखवण्याचा हा कथित चमत्कार करुन दाखवला आहे. याविषयी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हमीद दाभोलकर म्हणाले की, कारोनाची लस आणि अंगाला नाणी आणि भांडी चिकटण्या मागे साधा पदार्थ विज्ञानाच्या नियम आहे. त्याचा करोना लसीकरणाशी संबंध जोडणे चुकीचे आहे. लसीकरण हे करोना विरोधी लढ्यातील महत्वाचे शस्त्र आहे. त्याविषयी सनसनाटी दावे करण्याआधी त्याची चिकित्सा होणे आवश्यक आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT