नाशिक

Nashik News : रोजगार हमीच्या कामात नाशिकची आघाडी; जिल्ह्यात 127 कोटी रुपयांची कामे पूर्ण

Nashik : महसूल विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर या जिल्ह्यांपैकी नाशिक जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सर्वाधिक १२७ कोटी रुपयांची कामे झाली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महसूल विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर या जिल्ह्यांपैकी नाशिक जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सर्वाधिक १२७ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. त्या खालोखाल नंदुरबार (११७ कोटी), अहमदनगर (१०७ कोटी) व जळगाव जिल्ह्यात १०३ कोटींची कामे झाली. धुळे जिल्ह्यात केवळ ५६ कोटींची कामे झाली आहेत. (nashik Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme of 127 crore)

दरम्यान, नाशिक जिल्ह्याचा गत सहा वर्षांचा विचार करता २०१८-१९ मध्ये ७५.८३ कोटी, २०१९-२० मध्ये ५९.९३ कोटी, २०२०-२१ मध्ये ७२.२३ कोटी, २०२१-२२ मध्ये ६४.७२ कोटी, २०२२-२३ मध्ये १०१ कोटी व आता २०२३-२४ मध्ये १२७ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये राज्यात गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत जवळपास ५० टक्क्यांनी विक्रमी वाढ झाली.

रोजगार हमी योजनेत वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश झाल्याने रोजगार हमीच्या कामांमध्ये वाढ झाली असून, २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्यात कुशल व अकुशल मिळून चार हजार ४७६ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. विशेष म्हणजे रोजगार हमी योजनेत कुशल व अकुशलचे ४०:६० टक्के प्रमाण राखणे अनिवार्य असताना राज्यात ते प्रमाण ३५:६५ असे राखण्यात यश आले.  (latest marathi news)

रोजगार हमी योजनेतून सार्वजनिक कामांप्रमाणेच वैयक्तिक लाभाची घरकुल, फळबाग लागवड, जनावरांचा गोठा, शोषखड्डे, बांधावरील फळ लागवड, सिंचन विहिर, विहीर फेरभरण, भात खाचरे, गांडूळ खत, तुती लागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेततळे आदी कामे करता येतात. यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या पातळीवर रोजगार हमी योजनेच्या आराखड्यात वैयक्तिक लाभाच्या कामांचा मोठ्या प्रमाणात समावेश होत आहे.

ग्रामपंचायत पातळीवर अकुशल व कुशलचे ६०:४० चे प्रमाण राखून सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या कामांचा आराखडा तयार केला जातो. या सर्व आराखड्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यावर जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाते.

राज्यात चार हजार ४७६ कोटींची कामे

राज्यातील ३४ जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेतून कामे केली जातात. या सर्व जिल्ह्यांमध्ये २०२३-२४ या आर्थिक वर्षात चार हजार ४७६ कोटींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्या आधीच्या म्हणजे २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्यात दोन हजार ९८१ कोटी रुपयांची कामे करण्यात आली होती. या योजनेतून वर्षभरात ११ कोटी मनुष्य दिवस रोजगाराची निर्मिती झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heritage Travel: कुठे आहे महाभारतातील लाक्षागृह? उलगडणार ४००० वर्षे जुन्या संस्कृतीचे रहस्य! 'हेरिटेज ट्रेल'मधून युवकांना मिळणार रोजगार!

IPL 2026 News: अरे त्या, दीपक चहर, शार्दूल ठाकूरला पैसे द्या अन् घरी पाठवा! Mumbai Indians वर दिग्गजाचा पारा चढला; म्हणाले...

Ayan Ahmed: एक सल्ला, नंतर 'तो' मॅसेज अन् सापळा... अयान अहमदनं तरुणींना जाळ्यात कसं ओढलं? पडद्यामागचा सल्लागार लव्हगुरू कोण?

Latest Marathi News Live Update: TSC कंपनीला महिला आयोगाचे सदस्य देणार भेट

KCC Campaign : पशुपालकांसाठी खुशखबर! 'किसान क्रेडिट कार्ड'वर मिळणार ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; राज्य शासनाची विशेष 'KCC' मोहीम

SCROLL FOR NEXT