नाशिक

विषय समिती निवडणूक

CD
एन्कर फोटो : B61042, B61041, --------------- पाचही विषय समित्यांवर महायुतीची एकहाती सत्ता शहर सुधार, विधी आणि आरोग्य समितीच्या निवडणुका बिनविरोध; वर्चस्व बळकट सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : महापालिकेतील सत्ता समीकरण अधिक स्पष्ट झाले असून, महिला व बालकल्याण आणि शिक्षण समितीनंतर उर्वरित तीन विषय समित्यांच्या सभापती व उपसभापतिपदांच्या निवडणुकाही बिनविरोध पार पडल्या आहेत. शुक्रवारी (ता. ९) झालेल्या या निवडणुकीमुळे महापालिकेच्या पाचही महत्त्वाच्या विषय समित्या सत्तारूढ भाजप महायुतीच्या ताब्यात आल्या आहेत. महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील स्थायी समिती सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. यापूर्वी महिला व बालकल्याण आणि शिक्षण समितीची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्याच धर्तीवर शुक्रवारी शहर सुधार, विधी आणि वैद्यकीय साहाय्य व आरोग्य या तीन समित्यांसाठीही प्रत्येक पदासाठी केवळ एकच अर्ज दाखल झाला. त्यामुळे मतदानाची गरज भासली नाही आणि सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. निवडणुकीनंतर नवनियुक्त सभापती आणि उपसभापतींचा महापालिका पदाधिकारी आणि नगरसेवकांकडून सत्कार करण्यात आला. या वेळी उपमहापौर विलास शिंदे, गटनेते ॲड. श्याम बडोदे, माजी स्थायी सभापती अजय बोरस्ते, सीमा ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते. दरम्यान, पाचही विषय समित्यांवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्याने आगामी काळात महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये महायुतीची भूमिका अधिक निर्णायक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नगरसचिव संजय नेरकर, किशोर कोठावळे, मुकेश बैरागी आणि नगरसचिव विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. --- नवनिर्वाचित पदाधिकारी १. शहर सुधार समिती : सभापती - जागृती दत्तू गांगुर्डे, उपसभापती- जयंत अशोक जाचक २. विधी समिती : सभापती - जुई प्रणव शिंदे, उपसभापती - अंकिता महेंद्र शिंदे ३. वैद्यकीय साहाय्य व आरोग्य समिती : सभापती - डॉ. पुनम योगेश महाले, उपसभापती- सतीश आनंदराव निकम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवरात्रीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल! ठाणे-कल्याणमधील 'या' मार्गांवर नो एन्ट्री, काय असतील पर्यायी मार्ग?

Chandrashekhar Bawankule : राज्यातील फासेपारधी व पारधी समाजाच्या अतिक्रमित जमिनींचे सातबारे करण्यासाठी कार्यवाही होणार

Maharashtra Live News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर नवी मुंबईत भावुक क्षण; रांगोळीतून दिली अनोखी श्रद्धांजली

IND A vs AUS A 2nd ODI: भारताची पुन्हा हार, ऑस्ट्रेलियाकडून शिकार! पण 'एका'ने ठोकलाय न्यूझीलंड वन डे मालिकेसाठी दावा; कोण आहे तो?

नवरा असावा तर फडणवीसांसारखा! पती अन् मुलीसमोर अमृता फडणवीसांनी सादर केलं गाणं, असं केलं बायकोचं कौतुक

SCROLL FOR NEXT