Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : सोयगाव परिसरात मोबाईल चोरट्यांचा धुमाकुळ; मोबाईल वापरावा की नाही, मालेगावकरांना प्रश्‍न

Nashik News : सध्या सोयगावसह परिसरात मोबाईल व सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे घरातून बाहेर पडल्यावर मोबाईलसोबत न्यावा की नाही, असा प्रश्‍न नागरीकांना पडला आहे.

योगेश बच्छाव

Nashik News : मालेगाव शहरासह सोयगाव व परिसरात मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पायी चालताना मोबाईलवर बोलत जात असाल तर नागरिकांना सावधानकी बाळगावी लागत आहे. पायी चालणाऱ्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेणारी टोळी येथे सक्रीय आहे. मोबाईल चोरीच्या घटना येथे नित्याच्या झाल्या आहेत. (Nashik Crime News)

सध्या सोयगावसह परिसरात मोबाईल व सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे घरातून बाहेर पडल्यावर मोबाईलसोबत न्यावा की नाही, असा प्रश्‍न नागरीकांना पडला आहे. निर्मनुष्य रस्त्यावर एकटे जाणाऱ्या लोकांच्या बाजूने भुरटे चोर स्पोर्ट्स बाईक घेऊन येतात व बोलणाऱ्याच्या हातातील मोबाईल अचानकपणे हिसकावून घेत आणि क्षणार्धात रस्त्यावरून पसार होतात.

अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पार्श्‍वनाथ नगर, पवन नगर, शिवतीर्थ कॉलोनी, दौलती शाळा परिसर, सूर्यवंशी लॉन्स परिसर या भागातील मुख्य रस्त्यावर चोरट्यानी धुमाकूळ घातला आहे. दौलती शाळा ते डी. के. चौक या रस्त्यावर दुपारच्या वेळी अज्ञात व्यक्तीने परिसरातील रहिवाशांना अडवून मोबाईल हिसकावून नेला.

रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा चोरटे घेतात. तर काही टवाळखोर देखील रस्त्याने जातांना मुलींची छेड काढतात. त्यामुळे शालेय मुलींनी देखील या रस्त्याने येणे बंद केले आहे. याबाबत पोलिस प्रशासनाने दखल घेऊन गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे. (latest marathi news)

"दौलती शाळेसमोरील चौक हा वर्दळीचा भाग आहे. मात्र, सध्या या भागात मोबाइल व सोनसाखळी चोर सक्रिय झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दौलती रस्ता ते डी. के. चौक या रस्त्यादरम्यान अनेक पथदीप बंद अवस्थेत आहेत. मात्र, याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. लवकरात लवकर पथदीप बसवावेत, अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत." - जयवंत आहिरे, सामाजिक कार्यकर्ते

"डी. के. चौक ते दौलती रस्ता हा वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून रोज शालेय विद्यार्थी क्लास, शाळेत ये-जा करतात. मात्र, रस्त्यादरम्यान बऱ्याच ठिकाणी पथदीप बंद अवस्थेत आहेत. त्यात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ घातला आहे. तर रात्रीच्या वेळी आमचे मुले-मुली क्लास सुटल्यावर येत असतात. अंधार असल्यामुळे ते येण्यास घाबरतात. त्यामुळे संबंधित विभागाने दखल घ्यावी." - दादाजी काकाळीज, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदार कल्याणशेट्टींना मिळणार वाढीव पोलिस बंदोबस्त! जीवे मारण्याच्या धमकीनंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाने मागविला अक्कलकोट उत्तर पोलिसांकडून अहवाल, वाचा...

माझी भूमिका : ‘वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल’

१३ ऑगस्ट २०२६ पंचांग! श्रावणमासाला आजपासून सुरुवात; जाणून घ्या शुभ-अशुभ वेळा

आजचे राशिभविष्य - 13 ऑगस्ट 2026

Green Moong Dal Ladoo: साखर-गूळ नाही तरी चव भन्नाट! असे बनवा हिरव्या मूगडाळीचे प्रोटीनयुक्त लाडू

SCROLL FOR NEXT