Additional Commissioner Nutan Khade inspecting the muster at the attendance center in Malegaon. esakal
नाशिक

Nashik News : अतिरिक्त आयुक्तांच्या तपासणीत स्वच्छता कर्मचारी चक्क गैरहजर!

Nashik News : महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांनी संगमेश्‍वर, द्याने, अब्दुल्ला नगर या तीन स्वच्छता हजेरी सेंटरची पाहणी करून हजेरी मस्टर तपासले.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांनी संगमेश्‍वर, द्याने, अब्दुल्ला नगर या तीन स्वच्छता हजेरी सेंटरची पाहणी करून हजेरी मस्टर तपासले. यात त्यांना अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळले. तसेच, स्वच्छतेचा ठेका दिलेल्या दिग्विजय इंटरप्राईजेस या कंपनीचे कर्मचारी देखील गैरहजर असल्याचे तपासणीत दिसून आले. (Malegaon sanitation workers were absent in Additional Commissioner inspection)

संबंधित कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त श्रीमती खाडे यांनी संगमेश्वर हजेरी सेंटरवर भेट दिली. ४९ पैकी फक्त २३ कर्मचारी हे प्रत्यक्ष हजेरीसाठी उपस्थित होते. दोन कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गैरहजर कर्मचाऱ्यांना तत्काळ नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

शहरात स्वच्छतेचा ठेका दिग्विजय इंटरप्राईजेस या कंपनीला दिला आहे. अतिरिक्त आयुक्तांनी द्याने व अब्दुल्लानगर या स्वच्छता हजेरी सेंटरची देखील पाहणी केली. या ठिकाणी दिग्विजय एंटरप्राईजेसचे अनेक कर्मचारी गैरहजर होते. कंपनीच्या पर्यवेक्षकांना संबंधित कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्यास सांगितले. (latest marathi news)

गैरहजर कर्मचाऱ्यांसंदर्भात स्वच्छता निरीक्षक व मुकादमांना जाब विचारण्यात आला. यासंदर्भात अहवाल सादर करा. सातत्याने गैरहजर राहणाऱ्या व काम व्यवस्थित न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सक्तीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. श्रीमती खाडे यांनी दोन दिवसापुर्वी महापालिकेच्या शाळांना भेटी दिल्या होत्या. यावेळी देखील शिक्षक मोबाईल पाहण्यात दंग असल्याचे त्यांना आढळून आले.

"महापालिका हद्दीतील सर्व हजेरी सेंटरवर अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिग्विजय एंटरप्राईजेस व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेले काम जबाबदारीने करावे. महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अध्यायनावर लक्ष केंद्रीत करुन गुणवत्ता वाढवावी. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल." - रवींद्र जाधव, आयुक्त, मालेगाव महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT