Temperature  esakal
नाशिक

Nashik Summer Heat : उन्हाला वैतागले मालेगावकर! पारा 43.6 अंशावर

Nashik News : सूर्यदेव आग ओकत असतानाच ऐन दुपारी बाराच्या सुमारास येथे एक तास वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी उशिरापर्यंत उन्हाच्या झळा बसत होत्या.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : वाढते ऊन मालेगावकरांची पाठ सोडायला तयार नाही. गेल्या तेरा दिवसापासून येथे पारा ४२ अंशापेक्षा अधिक आहे. मंगळवारी (ता. ७) कमाल तापमान ४३.६ अंशावर तर किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस होते. सूर्यदेव आग ओकत असतानाच ऐन दुपारी बाराच्या सुमारास येथे एक तास वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी उशिरापर्यंत उन्हाच्या झळा बसत होत्या. (Malegaon Temperature at 43.6 degrees)

ऊन व उकाड्याने नागरिक त्रस्त झाले असून उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. शहर व परिसरात दीड महिन्यापासून उन्हाने कहर केला आहे. मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून उन्हाचा तडाखा बसत आहे. संपूर्ण एप्रिल महिन्यात तापमान ४० ते ४३ अंशादरम्यान होते.

कडक उन्हातच मालेगावकरांना लग्नसोहळ्यांना हजेरी लावावी लागली. मंगळवारी सकाळपासूनच उन्हाचे चटके व झळा बसत होत्या. दुपारी बारा ते चार या वेळेत रस्त्यांवरची वर्दळ एकदम कमी झाली होती. नागरिकांनी पंखे, कुलर लावून घरात बसणेच पसंत केले. गेल्या आठवड्यापासून रोज दुपारी एक ते दोन तास वीजपुरवठा खंडित होत आहे.

वाढत्या उन्हामुळे टोपी, उपरणे, गॉगल आदी विक्रेत्यांचा व्यवसाय वधारला आहे. रसवंतीगृहांवर दिवसभर तोबा गर्दी होत आहे. मालेगावच्या प्रसिद्ध मसाले ताकची चव चाखत अनेक जण उन्हापासून दिलासा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आईस्क्रीम, बर्फगोळे, कुल्फी आदी विक्रेत्यांच्या दुकानांवरही गर्दी होत आहे. (latest marathi news)

उन्हामुळे नागरिक त्रस्त असले तरी शीतपेय विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी ऊन लाभदायी ठरत आहे. ऊन मालेगावकरांचा घाम काढीत आहे. पावसाळा सुरु होण्यास अजून महिना बाकी आहे. किमान महिनाभर उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. कडक उन्हामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. याचा परिणाम बाजारपेठांसह इतर व्यवसायांवर होत आहे.

२४ एप्रिल - ४२.०

२५ एप्रिल - ४२.०

२६ एप्रिल - ४१.०

२७ एप्रिल - ४२.०

२८ एप्रिल - ४२.०

२९ एप्रिल - ४४.०

३० एप्रिल - ४३.२

१ मे - ४३.०

२ मे - ४२.४

३ मे - ४३.८

४ मे - ४२.८

५ मे - ४२.८

६ मे - ४२.६

७ मे - ४३.६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

West Indies Tour India 2025 : वेस्ट इंडिज संघ ७ वर्षांनी भारतात येणार; दिग्गज खेळाडूच्या मुलाला संधी, १५ सदस्यीय संघाची घोषणा

Latest Marathi News Updates : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कार

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT