7 MLA Suhas Kande while returning deposit money to depositors. Neighboring bank officer esakal
नाशिक

Nashik News : मनमाडच्या युनियन बँक शाखेकडून 7 ठेवीदाराच्या खात्यावर पैसे वर्ग

Nashik News : युनियन बँक शाखेतील कथित ‘एफडी घोटाळा’ गाजत असतानाच आमदार सुहास कांदे यांनी ठेवीदारांना दिलेला विश्‍वास गुरुवारी (ता. ३०) सत्यात उतरवून दाखवला.

सकाळ वृत्तसेवा

मनमाड : युनियन बँक शाखेतील कथित ‘एफडी घोटाळा’ गाजत असतानाच आमदार सुहास कांदे यांनी ठेवीदारांना दिलेला विश्‍वास गुरुवारी (ता. ३०) सत्यात उतरवून दाखवला. सदर प्रकरणातील ७ ग्राहकांना त्यांच्या मुदत ठेवीची रक्कम व्याजासह त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते या ७ ग्राहकांना २० लाख रूपये जमा करण्यात आल्याचे पत्र अधिकाऱ्यांनी दिले.

इतरांचेही पैसे मिळेपर्यंत आपण गप्प बसणार नाही, असा इशारा आमदार कांदे यांनी यावेळी दिला. येथील युनियन बँक शाखेत कोट्यवधी रुपयांचा एफडी घोटाळा झाला होता. मोठा अपहार झालेल्या या घटनेने केवळ नाशिक जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. शहरातील नागरिकांसह परिसरातील नोकरदार.

व्यापारी, कामगार, शेतकऱ्यांचे पैसे अडकल्यामुळे हवालदिल झालेल्या ठेवीदारांनी फसवणूक झाल्याने आमदार सुहास कांदे यांच्याकडे धाव घेऊन आम्हाला आमचे पैसे परत मिळवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. बँकेकडे प्राप्त तक्रारीनुसार सुमारे १२५ ग्राहकांच्या ७ कोटी २५ लाख रूपये रकमेचा अपहार झाला आहे.

याप्रकरणी पोलिसात संशयित संदीप देशमुख आणि बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. देशमुख यास अटक झाली. आमदार कांदे यांनी याप्रकरणी ग्राहकांना त्यांचे पैसे मिळावे म्हणून पुढाकार घेतला व स्वतः पोलिसात गुन्हा दाखल केला. आमदारच फिर्यादी झाल्याने बॅंक प्रशासनाचे धाबे दणाणले.

पैशांचा अपहार झालेल्या सर्व ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी आमदार कांदे यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी बँकेच्या वरिष्ठांशी सातत्याने पाठपुरावा केला. या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करण्यासाठी एसआयटी चौकशी समितीही नेमली. त्यामुळे बँकेने हे प्रकरण गंभीरतेने घेतले व आजअखेर ७ ग्राहकांना २० लाख रूपयांची व्याजासह रक्कम वितरीत करण्यात आली.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान, रिपाइंचे जिल्हाप्रमुख राजेंद्र आहिरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, गंगादादा त्रिभुवन, शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे, योगेश पाटील, योगेश इमले, महेंद्र शिरसाठ आदींसह शिससेना, भाजप, रिपाई महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dussehra Rally Speech: ‘’मी वर्क फ्रॉम होम अन् फेसबुक लाईव्ह करणारा नाही’’, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Shivsena Dasara Melava: ''...ही गोष्ट मान्य केली पाहिजे'', लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे भाजपवर बोलले

Dussehra Melava 2025 Live Update: हिंदुत्व म्हणजे टी-शर्ट आहे का?- एकनाथ शिंदे

Uddhav Thackeray Dussehra Rally : उद्धव ठाकरेंचा भर पावसात दसरा मेळावा; संघ, मोदी अन् 'कमळाबाई' थेट निशाण्यावर, म्हणाले...

Durga Visarjan Tragedy : दसऱ्याच्या उत्सवाला गालबोट, दुर्गादेवीचे विसर्जन करताना ६ तरुण बुडाले, दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT