Manoj Jarange Patil esakal
नाशिक

Manoj Jarange Patil News : मराठा तरुण तरुणींच्या लग्नपत्रिकेत झळकू लागलेत मनोज जरांगे-पाटील!

Nashik News : विवाह सोहळ्याच्या लग्नपत्रिकेत वधू-वरास शुभाशीर्वाद म्हणून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांचे नाव मराठा समाजातील तरुण तरुणींच्या लग्नपत्रिकेच्या दर्शनी भागात झळकू लागले आहे

विजय पगारे

इगतपुरी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आणि बघता बघता राज्यातील मराठा समाज जरांगे-पाटील यांच्याशी पाठीशी उभा राहिला आणि क्रांती घडली. जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाचे दैवत बनले. विवाह सोहळ्याच्या लग्नपत्रिकेत वधू-वरास शुभाशीर्वाद म्हणून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांचे नाव मराठा समाजातील तरुण तरुणींच्या लग्नपत्रिकेच्या दर्शनी भागात झळकू लागले आहे. (Nashik Manoj Jarange Patil marathi news)

आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून उपोषण केले आणि बघता बघता जरांगे-पाटील यांची राज्य नव्हे, तर देशात मराठा समाजाचे नेते म्हणून ओळख बनली. त्यांच्या सभांना राज्यात लाखोंची गर्दी होऊ लागली. त्यांच्या आंदोलनाने मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास भाग पडले.

त्यामुळे जरांगे-पाटील मराठा समाजातील तरुण तरुणींच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांना राज्यभरातून व्यापक पाठिंबा मिळत आहे. त्यांनी आरक्षणाच्या पाठपुराव्यासाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. तुळशीविवाहानंतर लग्नसराईला सुरवात झाली आहे. (Latest Marathi News)

नातेवाईक, मित्र मंडळींना निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिका छापल्या जातात. लग्नपत्रिकेत भाऊबंध, मामा मामी, काका-मावशी, मित्र, आजी-आजोबा, आत्या-मामा, जावई आदींची नावे व्यवस्थापक, स्वागतोत्सुक, संयोजक, किलबल परिवार, प्रमुख उपस्थिती, प्रेक्षक, कार्यवाहक, शुभाशीर्वाद, या प्रकारात टाकली जातात.

काही जण ‘शुभाशीर्वाद’मध्ये गुरू महाराज, मंत्री, खासदार व आमदार यांची नावे लग्नपत्रिकेत टाकतात, पण आता मराठा आरक्षणाची व्याप्ती आणि उभे राहिलेले आंदोलन व मिळालेले यश बघता विवाह सोहळ्याच्या पत्रिकेत काही परिवारांनी ‘शुभाशीर्वाद’मध्ये आमदार, खासदार, मंत्री यांच्याबरोबरीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांचे नाव टाकून त्यांच्याप्रति श्रद्धा व्यक्त करून एका नवीन पायंडाला सुरवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 1st ODI Live: रोहित, विराटच्या पुनरागमनाचा फुसका बार... ऑस्ट्रेलियाच्या डावपेचांसमोर भारताची हार! मालिकेत आघाडी

एआयच्या सहाय्याने बनलेली पहिली ‘महाभारत’ मालिका लवकरच येणार !

Thane News: मनसेने दिला ठाकरे गटाला मान! विद्युत रोषणाई कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

Mokhada ST Bus : ऐण सणात भंगारात निघालेल्या बस प्रवाशांच्या सेवेला, जव्हार आगाराचा गलथान कारभार, प्रवासी त्रस्त

Nashik Police : चोरट्यांसाठी आयती संधी? 'माझा शेजारी, खरा पहारेकरी' उपक्रमावर पोलिसांचा भर

SCROLL FOR NEXT