Officials and activists of BJP and Shinde group during the meeting held regarding the election of Nashik Bazar Committee.
Officials and activists of BJP and Shinde group during the meeting held regarding the election of Nashik Bazar Committee. esakal
नाशिक

Nashik Election: नाशिक बाजार समितीत आजी-माजी खासदार आमनेसामने? BJP अन् शिंदे गटाच्या बैठकीमुळे चर्चांना उधाण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात अग्रगण्य व जवळपास सहा आमदारांचे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा आजी-माजी खासदारांच्या पॅनलमध्ये थेट लढतीचे चिन्हे दिसू लागली आहेत. खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयात झालेल्या भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्या बैठकीमुळे या चर्चांना उधाण आले आहे. (Nashik market committee election Meeting of BJP and Shinde group sparks discussions nashik news)

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या बाजार समितीची निवडणूक म्हणजे खासदाराची तयारीच होय. या बाजार समितीत जिल्हाभरातून नव्हे, तर इतर जिल्ह्यातूनदेखील शेतकरी भाजीपाला, फळभाज्या, कांदा, डाळिंब घेऊन येत असतात.

यापूर्वी उद्धव ठाकरे गटात असलेले खासदार हेमंत गोडसे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. नाशिक बाजार समितीवर माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे वर्चस्व आहे. त्यांना शह देण्यासाठीच भाजप-शिवसेना एकत्र आली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रल्हाद काकड, धनाजी पाटील, तानाजी करंजकर, शिवसेनेचे (शिंदे गट) अनिल ढिकले, सदाभाऊ नवले, सरपंच परिषदेचे तानाजी गायकर, माजी नगरसेवक तथा माजी सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती शिवाजी चुंभळे, शंकरराव धनवटे, प्रताप चुभळे, अजिंक्य चुभळे आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या अनुषंगाने बाजार समिती मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. खासदार गोडसे यांनी भाजप व शिवसेना गटाच्या पॅनलचे नेतृत्व करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT