Due to the Lal Badal movement of tribal farmers in front of the collector office for four days, customers are not able to come to bajarpet in Mahatma Gandhi Road, central bus station area, Shivaji Road area. esakal
नाशिक

Nashik Adivasi Morcha : 5 दिवसापासून बाजारपेठ ठप्प, लोकप्रतिनिधी गप्प!

Adivasi Morcha : शेतकरी व कामगारांच्या मागण्यांसाठी माकप व किसान सभेने सुरू केलेल्या आंदोलनाला पाच दिवस उलटले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Adivasi Morcha : शेतकरी व कामगारांच्या मागण्यांसाठी माकप व किसान सभेने सुरू केलेल्या आंदोलनाला पाच दिवस उलटले. आंदोलनात सीबीएस ते अशोकस्तंभ दरम्यानच्या स्मार्ट रस्त्यावर आंदोलनकर्त्यांनी मुक्काम ठोकल्याने वाहतूक बंद आहे. बाजारपेठ व बाजारपेठेकडे जाणार मुख्य रस्ते बंद असल्याने ग्राहक या भागात जाण्याचे टाळतात. त्यामुळे अर्थकारण कोलमडले असून, पाच दिवसात करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. (Nashik Markets closed due to Adivasi Morcha marathi news)

आंदोलनकर्ते शांततेत आंदोलन करत असून त्यांच्या आंदोलनाबद्दल व्यावसायिकांना आक्षेप नाही. परंतु शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन वाहतूक बंद केल्याने निर्माण झालेली आर्थिक कोंडी सोडवावी अशी मागणी आहे. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने पोलिसांना त्यांना हटविता येत नाही. त्यामुळे बेरिकेट्‌स लावून वाहतूक बंद केली आहे.

सीबीएस, मेहेर, अशोकस्तंभ, महात्मा गांधी रोड, गोळे कॉलनी, रविवार कारंजा व रविवार पेठ, शिवाजी रोड, शालिमार, त्र्यंबक रोड, शरणपूर रोड, गंगापूर रोड या बाजारपेठेच्या भागाकडे येणारा वर्ग येणे बंद झाला परिणामी अर्थकारण ठप्प झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, तहसिल कार्यालय, एलआयसी, टपाल खाते या भागात आहे.

औषध विक्रीची महत्त्वाची बाजारपेठ आहे. होलसेल दरात औषधे विक्रीची साडेतीनशे दुकाने आहेत. या घटकांवर आर्थिक परिणाम झाला आहे. दोन शाळा, दोन कनिष्ठ महाविद्यालये आहेत. बारावीच्या परीक्षार्थींना वाहतूक सुरळीत नसल्याने परीक्षेला अर्धा तास अगोदर पोचावे लागते.(latest Marathi News)

''गोळे कॉलनी भागात औषधांची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या चार दिवसांपासून वाहतूक बंद असल्याने दुकानांमध्ये येणारा वर्ग ६० टक्क्यांनी कमी झाला आहे. अशोकस्तंभ ते मुंबई नाका या दरम्यानची मेडीकल फक्त नावाला खुली आहेत.''- सुदेश आहेर, अध्यक्ष, नाशिक जिल्हा केमिस्ट संघटना.

''आंदोलनाला विरोध नाही, शांततेत व लोकशाही मार्गाने सुरू आहे. परंतु प्रशासनाने वाहतूक सुरळीत केल्यास ठप्प झालेली बाजारपेठ पुन्हा सुरू होईल. रस्ते बंद असल्याने ग्राहकांना लांबचा फेरफटका मारावा लागतो. ग्रामिण भागातून आलेल्या ग्राहकांना शक्य होत नाही.''- प्रदीप चौधरी, व्यावसायिक.

''कॉलेज रोड, शरणपूर व गंगापूर रोड या भागातून येणारा ग्राहक वर्ग पूर्णपणे बंद आहे. आमच्या दुकानात येणारा ग्राहक गेल्या तीन दिवसापासून येत नाही. स्वतःची गाडी घेऊन येणारा ग्राहक तर गेल्या तीन दिवसापासून आलेला नाही. रोज एकूण व्यवसायापैकी 40 टक्के नुकसान होत आहे.''- महेश चौधरी, मंगल क्लास सेंटर मेन रोड

''संपूर्ण नाशिकमधून गंगापूर रोड येथे येणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. कारण या परिसरात सर्वाधिक शाळा व महाविद्यालय आहेत. मोर्चेकरी अशोकस्तंभ परिसरात मुक्कामी असल्यामुळे बसने व रिक्षाने येणारा विद्यार्थी तीन दिवसापासून आलेला नाही. प्रशासनाने मोर्चेकरांना दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी.''- प्रवीण धुमाळ, श्रीसाईनाथ, भेळभत्ता सेंटर अशोकस्तंभ

''आमचं स्पोर्ट्स विक्रीचे दुकान आहे. ग्राहक वर्ग मर्यादित आहे. तीन दिवसापासून मोर्चामुळे एमजी रोडची संपूर्ण बाजारपेठ ठप्प आहे. आमचे प्रशासनाचा आवाहन आहे, शासनाने मोर्चेकरांना जागा निश्चित करून द्यावी.''- सचिन सेठी, जय स्पोर्ट्स ॲन्ड गिफ्ट, एमजी रोड

''शहराच्या मध्यवर्ती भागी असलेल्या एमजी रोडवर आमचे फोटोग्राफीचे दुकान असून सुद्धा रोज येणारा ग्राहकांचे प्रमाण कमी आहे. त्यातच गेल्या तीन दिवसापासून मोर्चामुळे आमच्या दुकानांमध्ये एकही ग्राहक आलेला नाही. मोर्चाचे ठिकाण हे गोल क्लब मैदान असावे.''- बिरजू नेभनानी, डायमंड फोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT