temperature esakal
नाशिक

Nashik Summer Heat : सर्वाधिक उष्माघाताचे 23 रुग्ण नाशिक जिल्ह्यात; रुग्णसंख्येत वाढ होण्याचा आरोग्य विभागाचा अंदाज

Nashik News : एक मार्चपासून आतापर्यंत राज्यभरात उष्माघाताच्या २०२ रुग्णांची नोंद झाली. यात, सर्वाधिक २३ रुग्णांची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा ४० ते ४५ अंशांवर पोहोचला असल्याने उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. एक मार्चपासून आतापर्यंत राज्यभरात उष्माघाताच्या २०२ रुग्णांची नोंद झाली. यात, सर्वाधिक २३ रुग्णांची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली आहे. (Nashik Maximum 23 heat stroke patients in district)

या पाठोपाठ पुणे जिल्ह्यात सात रुग्ण आढळून आले. उन्हाचा पारा वाढत असल्याने आगामी काळात रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. राज्यासह अनेक जिल्ह्यांत यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे राज्यात दुष्काळाचे संकट गंभीर आहे. यातच, मार्चच्या मध्यावर्तीपासूनच उष्णतेची लाट वाढत आहे. जिल्ह्याचा पारा हा ४० अंशांच्या पुढे गेला.

मार्चपेक्षा एप्रिलमध्ये उन्हाचा तडाखा वाढला होता. दुष्काळी परिस्थिती असल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केली होती. राज्यात १ मार्च ते ६ मे या कालावधीत उष्माघाताच्या २०२ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक २३ रुग्ण नाशिक जिल्ह्यातील आहेत.

त्या खालोखाल बुलढाणा २१, जालना आणि धुळे प्रत्येकी २०, सोलापूर १८ आणि सिंधुदुर्ग १० अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात यंदा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद कोठेही झालेली नाही. गेल्या वर्षी राज्यात १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उष्माघातामुळे तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला होता. (latest marathi news)

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक २३ उष्माघाताचे रुग्ण आहेत. जिल्ह्यात यंदा केवळ ६९ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्‍ह्यात दुष्काळाचे सावट गडद आहे. यात जिल्ह्याचा पारा हा ४० अंशांच्या पुढे गेला. प्रामुख्याने मालेगाव, येवला व नांदगाव या दुष्काळी तालुक्यांमध्ये उष्मघाताची लाट आहे. त्यामुळे उष्माघात रुग्णांचे प्रमाण वाढले. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सर्वाधिक सात, तर मालेगावात पाच रुग्ण सापडले.

तालुकानिहाय उष्माघाताचे रुग्ण

सुरगाणा (२), निफाड (७), मालेगाव महापालिका (२), बागलाण (१), सिन्नर (१), इगतपुरी (२), देवळा (१), मालेगाव (५), नांदगाव (१), येवला (१).

"यंदा राज्यासह नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने दुष्काळ आहे. यात उन्हाचा पारा ४० अंशांच्या पलीकडे जातो. त्यामुळे दुष्काळी तालुक्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढली आहे. मात्र, आरोग्य विभाग हा ‘अलर्ट’ असून, जिल्ह्यातील सर्व ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रांत स्वतंत्र उष्माघात कक्ष कार्यान्वित केले. येथे सर्व उपचार व औषधसाठा याची सुविधा आहे." - डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : भाषेची सक्ती केल्यास आम्ही शक्ती दाखवू - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT