गिरणारे : मायना डोंगरावर भडकलेला वणवा. sakal
नाशिक

नाशिक : मायना डोंगर वणव्यात भस्मसात

स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणमित्रांनी विझविली आग

सकाळ वृत्तसेवा

गिरणारे/गंगापूर : नाशिकच्या उत्तरेस बोरगडाच्या दक्षिणेस असलेल्या मायना या पर्यावरणीय डोंगरास गुरुवारी (ता. १७) दुपारी उत्तरेस वणवा लागला. हा वणवा थेट मायन्याच्या चारही बाजूने पसरला. तब्बल १२ वाजेपर्यंत अथक परिश्रमातून स्थानिक ग्रामस्थ, वनविभाग, वृक्षमित्रांनी मोठ्या कसोटीने विझविला. यामुळे मोठी हानी टळली असली तरी वणव्यात मात्र मायना डोंगराच्या भागातील हजारो एकरावरील अतोनात जैवविविधतेचे नुकसान झाले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही वणवे वाढले असून, जंगल रांगेत जाळपट्टे वाढवावे, सह्याद्रीतील डोंगररांगा, घाट, जंगल, गडकोटांच्या भूमीला संरक्षण द्यावे अशी मागणी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, वृक्षवल्ली फाउंडेशन, दऱ्यादेवी पर्यावरण यांनी केली आहे. दुपारी बोरगडाच्या दक्षिणेस असलेल्या मायना डोंगरास वणवा लागल्याची खबर राजाराम कसबे या तरुण शेतकऱ्याने दिली. त्यानंतर वनविभाग कंट्रोलला तातडीने फोन करून खबर देण्यात आली. मायना डोंगराची आग सांयकाळपर्यंत अख्ख्या डोंगरास वळसा घालून लागली.

थेट दरी पर्यावरणीय भागात ही आग वाढत असल्याचे कळताच गवळवाडी, दरी गावाचे लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, वनविभागाचे सुनीता देशमुख, सामाजिक कार्यकर्ते विनोद जवागे, दऱ्यादेवी देवस्थान पर्यावरणाचे भारत पिंगळे, शिवाजी धोंडगे, वृक्षवल्लीचे तुषार पिंगळे, दरीचे उपसरपंच ॲड. अरुण दोंदे, राजेंद्र पिंगळे, प्रभाकर भोई, भाऊराव आचारी, संजय दोंदे, केरू बेंडकोळी, अर्जुन भोई, शीतल पिंगळे, गोकुळ धोंडगे, बाजीराव घोटे, रमेश गोडे, तुषार गोडे, प्रमोद गोडे व गवळवाडी, दरी व परिसरातील १०० हुन अधिक तरुणांनी, ग्रामस्थांनी झाडांच्या फांद्यानी वणवा झोडपून आगीवर अखेर रात्री ११ वाजता नियंत्रण मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुबई एअर शोदरम्यान मृत पावलेले विंग कमांडर नमन स्याल कोण होते? पत्नीही वायूदलात अधिकारी...

Love Rashifal 2025: डिसेंबरमध्ये गुरू व चक्र ग्रहाचे भ्रमण! ‘या’ राशींच्या प्रेमजीवनात येणार मोठा बदल

Latest Marathi News Live Update : सिन्नरच्या नायगावात गावगुंडांचा कहर! पन्नास हजारांची खंडणी न दिल्यास दुकान पेटवण्याची धमकी

Maharashtra Politics: राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ! भाजपला झटका, अनेक कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

PM किसानचे 2000 रुपये अजून आले नाही? झटपट 'इथे' करा तक्रार; एका मिनिटात येतील पैसे..

SCROLL FOR NEXT