mayur.jpg
mayur.jpg 
नाशिक

भाजप विकासकामांचा बार उडविण्याच्या तयारीत; महापौरांनी दिली फडणवीसांना माहिती

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळात करण्यात आलेली विकासकामे व येत्या काळात शहर बससेवा सुरू केली जाणार असल्याने त्या कामांचे लवकरच उद्‌घाटन सोहळा आयोजित करून भाजपकडून विकासाचा बार उडविण्याची तयारी करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कामांसदर्भात बुधवारी (ता. ६) महापौर सतीश कुलकर्णी यांनी माहिती दिली. 

विरोधी पक्षनेते फडणवीसांना दिली माहिती 

महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता येण्याअगोदर नागरिक विविध विकासकामांपासून वंचित होते. त्यामुळे भाजपच्या सत्ता कालावधीत नाशिकच्या जनतेसाठी विविध नागरीहिताची व विकासकामे पूर्णत्वास येत आहे. त्यामधील शहराचा वाढता विस्तार बघता पिण्याच्या पाण्याची कमतरता नागरिकांना भासू नये याकरिता शहरातील विविध भागांत २० जलकुंभांच्या उभारणीचे कार्यारंभ आदेश देण्याचे पूर्णत्वास आहे. तसेच, शहरात एलईडी लाइट बसविणेबाबतचा घेतलेला निर्णय प्रभावीपणे राबविण्यात आला आहे. जवळपास ८० टक्के काम पूर्णत्वास आले आहे. तसेच महापालिकेच्या वतीने शहर बससेवा सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर शहरात विकसित न झालेल्या उपनगर व कॉलनी परिसरात, २३ समाविष्ट खेड्यामध्ये रस्ते तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या सर्व कामांचा लोकार्पण सोहळा होणार असून, त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रभारी जयकुमार रावल यांना निमंत्रित केले जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर कामांची माहिती आज देण्यात आली. या वेळी सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील यांनी भेट घेतली. 

भाजपकडून वातावरणनिर्मिती 

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शहरात विविध विकासकामांचा धडाका लावला जाणार आहे. पूर्णत्वास आलेल्या कामांचे लोकार्पण, रस्ते, उड्डाणपुलांच्या कामांचे भूमिपूजन करून भाजपकडून वातावरणनिर्मिती केली जाणार आहे. महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक कामे भाजप सत्तेच्या काळात झाल्याचा दावा यानिमित्ताने केला जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT