Police taking Bhushan Patil, Abhishek Balakwade, the suspected accused in the MD drugs case, to the court on Wednesday. esakal
नाशिक

Nashik MD Drug Case: भूषण पाटील, बलकवडेला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Nashik MD Drug Case : ड्रग्जमाफिया ललित पाटील याचा भाऊ संशयित भूषण पाटील व त्याचा खजिनदार अभिषेक बलकवडे या दोघांचा ताबा घेतल्यावर नाशिक पोलिसांनी त्यांना बुधवारी (ता. ६) न्यायालयात हजर केले.

त्यांना बुधवार (ता. १३)पर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यांचा साथीदार संशयित शिवाजी शिंदे यास शनिवार (ता. ९)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. (Nashik MD Drug Case Bhushan Patil Balkawade in police custody till Wednesday news)

नाशिकसह राज्यभर गाजत असलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांनी भूषण व अभिषेकला ताब्यात घेतले आहे. शिवाजीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले.

या तिघांचा ताबा आता नाशिक पोलिसांनी घेतला असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. शिवाजीच्या कोठडीत पुन्हा तीन दिवसांची वाढ करण्यात आली.

पुढील चौकशीकरिता भूषण व अभिषेक यांच्या कोठडीची मागणी सरकार पक्षाकडून ॲड. देवरे यांनी केली. दरम्यान, नाशिक रोड पोलिसांनी शिंदे गावाजवळ छापा टाकून ड्रग्जचे गुदाम उद्‌ध्वस्त केले होते.

एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारा कच्च्या मालाचा साठा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात हस्तगत केला होता. हे गुदाम संशयित ड्रग्जमाफिया ललित पानपाटील याचे की त्याचा भाऊ संशयित भूषण पाटीलचे, असा प्रश्न कायम होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: आमदार प्रशांत बंब यांची पत्रकार परिषद; प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम

वयाच्या ५४ वर्षीही लाचेचा मोह! एक लाखाची लाच मागणारा मंडलाधिकारी अटकेत; मुरूम वाहतुकीच्या परवानगी अर्जावरील सकारात्मक अहवालासाठी मागितली लाच, वाचा...

Shirur civic protest: घनकचरा गैरव्यवहार, किमान वेतन उल्लंघनासह विविध मागण्यांसाठी मनसेचे महिबूब सय्यद यांचे शिरूर नगरपरिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन

Dighi-Bhosari MD lab bust: पुण्यातील दिघी-भोसरीत एमडीची हायटेक प्रयोगशाळा उघड; ‘ऑपरेशन वज्र’मध्ये दोन प्रमुख तस्कर अटकेत

‘एसआयआर’ कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा! फोन उचलला नाही, घरी भेटले नाहीत, ‘कारणे दाखवा’चा खुलासाही दिला नाही, वाचा...

SCROLL FOR NEXT