Drugs esakal
नाशिक

Nashik MD Drug Case: शिंदे गावातील ‘ती’ कंपनीच बोगस

सकाळ वृत्तसेवा

Nashik MD Drug Case : मुंबई पोलिसांनी शुक्रवारी (ता. ६) नाशिकमध्ये एम. डी. ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई केल्यानंतर शनिवारी नाशिक रोड पोलिसांनी एक मोठी कारवाई करत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला आहे.

या ड्रग्जची किंमत जवळपास ३०० कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गावातच ही दुसरी कारवाई केल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. (Nashik MD Drug Case company in Shinde village bogus Crime)

गुन्हे शोध पथकाने कारखाना शोधून काढत ही कारवाई केली, तर दुसरीकडे ही कंपनीच बोगस असून, या कंपनीबाबत कुठलीच नोंद उद्योग विभागासह इतर सरकारी यंत्रणाकडे नसल्याचे आज समोर आले.

शिंदे एमआयडीसी येथील प्लॉट क्रमांक ३५ वरील श्री गणेशाय इंडस्ट्रीज या नावाची कंपनीची नोंद शासनाच्या कोणत्याही विभागाकडे नसल्याचे समोर येत आहे. ग्रामीण भागात ही कंपनी असल्याने याकडे यंत्रणांचे साफ दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.

ग्रामीण भागाचा फायदा घेऊन पाटील बंधूंनी नाशिकमधील सहकारीच्या मदतीने एम. डी. ड्रग्जचे मुख्य केंद्र बनविल्याचे उघड झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT