नाशिक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी १२.७१ हेक्टर जमीन

CD
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी १२.७१ हेक्टर जमीन महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामास शासनाची मंजुरी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बांधकामासाठी १२.७१ हेक्टर शासकीय जमीन उपलब्ध करण्यास महसूल विभागाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून हा निर्णय घेतला आहे. नाशिक शहरातील दिंडोरी रोडवरील गट क्रमांक ११७ मधील एकूण १३.४० हेक्टरपैकी मेरी संस्थेला यापूर्वी दिलेली ०.६९ हेक्टर क्षेत्र वगळून उर्वरित १२.७१ हेक्टर जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी दिली जाणार आहे. ही जमीन महसूलमुक्त आणि भोगाधिकार मूल्यरहित किमतीने देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यापूर्वी म्हसरूळ येथील १४.३१ हेक्टर जमीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी दिली होती. मात्र, ही जमीन वन विभागाची असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तो निर्णय रद्द करण्यात आला. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयासाठी गट क्रमांक ११७ मधील नव्या जागेचा प्रस्ताव मंजूर केला आहे. नवीन जागेचा वापर केवळ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या मंजूर कामांसाठी करता येणार आहे. ताबा मिळाल्यानंतर तीन वर्षांच्या आत मंजूर काम सुरू करणे बंधनकारक असेल. कोट नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करण्याचा निर्णय आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या आणि नाशिकमध्ये वैद्यकीय शिक्षणासोबत आरोग्यसेवेच्या सुविधा अधिक सक्षम होण्यासाठी शासन आवश्यक सहकार्य करत आहे. - चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री इन्‍फो चार वर्षांपासून रखडलेला प्रश्न निकाली जागेच्या वादात गेल्या चार वर्षांपासून रखडलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या चार ते पाच वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. या प्रस्तावासाठी प्रारंभीस तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळची जागा निश्चित केली होती. त्यानंतर महायुतीचे सरकार आल्यावर आमदार राहूल ढिकले यांनी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याच्या दृष्टिकोनामधून पाठपुरावा सुरू केला. विद्यापीठाची जागा शहराबाहेर असल्यामुळे मेरीच्या मध्यवर्ती भागामध्ये महाविद्यालय झाल्‍यास पंचवटी, नाशिक रोडसोबत संपूर्ण शहरांमधील रुग्णांना फायदा होईल. ढिकले यांनी सातत्याने मेरीच्या जागेसाठी पाठपुरावा सुरूच ठेवला. अखेर प्रश्‍न मार्गी लागला आहे. छायाचित्र कोट नाशिकमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रत्यक्ष रुग्णसेवेचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. थोडक्यात चांगले उपचारही मिळतील आणि चांगले डॉक्टरही घडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानतो. - ॲड. राहूल ढिकले, आमदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

वीर पहाडियाचा रोमँटिक अंदाज, आफिया सय्यदचं पदार्पण; ‘प्रेम कीटाणू’ ठरतोय तरुणाईचा सिनेमा?

SCROLL FOR NEXT