नाशिक

दिवाळी अंकासाठी लेखः मेडिकल टुरिझममध्ये जागतिक नकाशावर पोहचलेय नाशिक

CD
१२ वा लेख मेडिकल टुरिझममध्ये नाशिक जागतिक नकाशावर ------------------------ गेल्या काही वर्षांत नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे, तो म्हणजे ‘आरोग्य पर्यटनाचे केंद्र’ म्‍हणून निर्माण झालेल्‍या ओळखीमुळे. अत्याधुनिक रुग्णालये, निष्णात डॉक्टर्स, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांची सहज उपलब्धता आणि अ‍ॅलोपॅथीपासून ते निसर्गोपचारापर्यंतच्या सर्व पॅथींचा अप्रतिम मेळ यामुळे नाशिक आरोग्य क्षेत्रात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर रुग्णांचे पसंतीचे केंद्र ठरत आहे. - अरुण मलाणी, नाशिक आरोग्य पर्यटनाच्या दृष्टीने नाशिकला सर्वात मोठी निसर्गदत्त देणगी लाभली आहे ती इथल्या आल्हाददायक आणि समशीतोष्ण हवामानाची. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांच्या तुलनेत नाशिकमधील प्रदूषणविरहित, शांत आणि शुष्क हवामान रुग्णांच्या आजारपणातून लवकर बरे होण्यासाठी अत्यंत पोषक ठरते. मुंबई आणि पुण्यातून केवळ तीन ते चार तासांचे रस्ते अंतर, समृद्धी महामार्गामुळे थेट विदर्भ-मराठवाड्याशी जोडलेली कनेक्टिव्हिटी आणि वाढती विमानसेवा यामुळे देशभरातील तसेच परदेशातील रुग्णांना नाशिक सहज गाठता येते. नाशिकमध्ये गेल्या दशकात अ‍ॅलोपॅथी क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाले आहेत. शहरात नामांकित मल्टी-स्पेशालिटी आणि सुपर-स्पेशालिटी कॉर्पोरेट रुग्णालयांचे जाळे उभे राहिले आहे. कार्डिॲक केअर, ओपन हार्ट सर्जरी, अँजिओप्लास्टी, मेंदू व मणक्यांच्या अत्यंत किचकट शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारे हायटेक कॅथलॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आणि रोबोटिक तंत्रज्ञान नाशिकमध्ये उपलब्ध आहे. कर्करोगावरील उपचारांसाठी पूर्वी मुंबईच्या टाटा रुग्णालयात खेटे घालावे लागायचे. आज नाशिकमध्ये अत्याधुनिक रेडिएशन थेरपी, पेट-स्कॅन, टार्गेटेड केमोथेरपी आणि कर्करोग शस्त्रक्रियांची जागतिक दर्जाची सोय उपलब्ध आहे. किडनी व लिव्हर ट्रान्सप्लांटसारख्या अतिगुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आज नाशिकचे स्थानिक तज्ज्ञ यशस्वीपणे पार पाडत आहेत. सांधेबदल शस्त्रक्रियेसाठी तर देश-विदेशातील रुग्ण नाशिकच्या ऑर्थोपेडिक तज्ज्ञांकडे मोठ्या संख्येने येत आहेत. आणखी एका गोष्टीचा आवर्जून उल्‍लेख केला पाहिजे, ते म्‍हणजे नाशिकच्‍या रुग्‍णालयांमध्ये उपलब्‍ध अत्‍याधुनिक तंत्रज्ञान. रोबोटिक शस्‍त्रक्रियेसोबत लेप्रोस्‍कोपिक सर्जरी व इतर आधुनिक तंत्रज्ञान आधारित उपचार होत असल्‍याने रुग्‍णांना या तंत्रज्ञानाचा लाभ होतो आहे. नाशिकचे सर्वात मोठे वेगळेपण म्हणजे येथे केवळ अ‍ॅलोपॅथीवरच भर दिला जात नाही, तर प्राचीन आणि आधुनिक सर्वच उपचार पद्धतींचे पर्याय उपलब्ध आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसराला औषधी वनस्पतींची आणि आयुर्वेदाची मोठी परंपरा आहे. शहरात जागतिक मानकांनुसार काम करणारी पंचकर्म केंद्रे विकसित झाली आहेत. पक्षाघात, संधिवात, त्वचारोग आणि पचनसंस्थेच्या जुनाट व्याधींवर उपचारासाठी गुजरात, राजस्थानसह परदेशातून अनेक पर्यटक येथे दीर्घकालीन मुक्कामासाठी येतात. होमिओपॅथी शाखेतील विविध संस्थांमुळे नाशिकमध्ये होमिओपॅथीचा पाया भक्कम आहे. दुर्धर आणि ऑटो-इम्यून आजारांवर सुरक्षित व परिणामकारक उपचारांसाठी नाशिकची होमिओपॅथी क्लिनिक्स प्रसिद्ध आहेत. शहराच्या परिघावर, विशेषतः इगतपुरी आणि त्र्यंबक रोड परिसरात भव्य वेलनेस सेंटर्स, निसर्गोपचार केंद्रे आणि ध्यानकेंद्रे उभारली गेली आहेत. विपश्यना केंद्रापासून ते डिटॉक्सिफिकेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि जीवनशैली विकार नियंत्रणात आणण्यासाठी ही केंद्रे उत्तम काम करत आहेत. कमी खर्च ठरतो निर्णायक घटक... आरोग्य पर्यटनाचा विचार करताना ‘उपचार खर्च’ हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. पुणे, मुंबईसारख्या महानगरांच्या तुलनेत नाशिकमध्ये कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेचा किंवा दीर्घ उपचारांचा खर्च ३० ते ४० टक्क्यांनी कमी आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची फी, रुग्णालयातील बेड चार्जेस, तपासण्यांचा खर्च आणि रुग्णासोबत येणाऱ्या नातेवाइकांच्या राहण्या-खाण्याचा खर्च या सगळ्याच बाबतीत नाशिक किफायतशीर ठरते. त्यामुळे महाराष्ट्रभरातून व भारतभरातून रुग्‍ण येथे उपचारासाठी येतात. तसेच परदेशातील रुग्णांसाठी तर हा खर्च जागतिक दरांच्या तुलनेत अत्यंत नगण्य असतो. त्यामुळे तेदेखील नाशिकला पसंती देत आहेत. ''हिलिंग विथ टुरिझम'' रुग्ण बरा होत असताना त्याच्या मानसिक स्वास्थ्यासाठी फिरणे आणि रिलॅक्स होणे आवश्यक असते. नाशिकमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्र्यंबकेश्वर, पंचवटी, मुक्तिधाम यांसारख्या आध्यात्मिक स्थळांना; अंजनेरी, हरिहर यांसारख्या निसर्गरम्य परिसरांना तसेच वाइन टुरिझमला भेट देऊ शकतात. त्यामुळे उपचाराचा ताण कमी होऊन एका आल्हाददायक वातावरणात ''हिलिंग''ची प्रक्रिया पूर्ण होते. नाशिकने आरोग्य सेवेत विश्वासार्हता, अद्ययावत तंत्रज्ञान आणि संवेदनशील रुग्णसेवा यांचा समतोल साधला आहे. रुग्णालयांना मिळणारे आंतरराष्ट्रीय मानांकन (एनएबीएच) आणि येथील अनुभवी वैद्यकीय मनुष्यबळ यामुळे हे शहर आगामी काळात देशातील अव्वल आरोग्य पर्यटन केंद्र म्हणून स्वतःची ओळख अधिक गडद करेल यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी चुयेकर, समांतर सभेत मोठी घोषणा; सतेज पाटलांचा मास्टरस्ट्रोक, आता महायुतीच्या भूमिकेकडे लक्ष

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Latest Marathi News Update: आदिवासी महिलेचे चोरी झालेले मंगळसूत्र मिळाले

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

WPL AUCTION 2027: वय फक्त १५ वर्षे, WPL ऑक्शनमध्ये इतिहास! दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला निवडलं, कोण आहे ही युवा अष्टपैलू खेळाडू?

SCROLL FOR NEXT