Milk esakal
नाशिक

Nashik Milk Rates Hike: शहरात दैनंदिन 3 हजार लिटर दुधाची मागणी वाढली! सणाच्या पार्श्‍वभूमीवर दरात लिटर मागे 10 रुपयांनी वाढ

Nashik News : रमजान पर्व, होळी, अन्य विविध सण उत्सव आणि उन्हाळ्यानिमित्त शीतपेयांसाठी दुधाची आवश्यकता भासत असते.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : रमजान पर्व, होळी, अन्य विविध सण उत्सव आणि उन्हाळ्यानिमित्त शीतपेयांसाठी दुधाची आवश्यकता भासत असते. दैनंदिन सुमारे दोन ते तीन हजार लिटर दुधाने मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात लिटर मागे दहा रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. (Nashik Milk Rate Hike Daily demand of milk increased in city marathi news)

सध्या रमजान पर्व सुरू आहे. सहेरीत तिखट खाण्याऐवजी अनेक जण दूध पोळी, दूध पाव, दुधातील सेवाई यासह अन्य दुधाचे पदार्थ सेवन करत असतात. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठीही दुधाचा वापर केला जातो. याशिवाय होळी आणि अन्य सण उत्सवानिमित्तानेही दुधाच्या मागणीत वाढ झाली आहे.

त्याचप्रमाणे उन्हाळ्यातही लस्सी, ताक, दही तयार करण्यासह शीतपेय आइस्क्रीम सेवन करण्याकडे नागरिकांचा कल अधिक दिसून येतो. असे पदार्थ तयार करण्यासाठी दुधाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे दुधाच्या मागणीत सुमारे दोन ते तीन हजार लिटरने मागणी वाढली आहे. (latest marathi news)

तर दुसरीकडे आवक कमी मागणी अधिक अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दुधाच्या दरात लिटर मागे दहा रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी ७० ते ७५ रुपये लिटरने दूध विक्री होत होते. सध्या ८० ते ८५ लिटर विक्री होत आहे. येत्या काही दिवसात आणखी मागणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आवक स्थिर

सण आणि उन्हाळामुळे दुधाची मागणी जरी वाढली असली. तरी आवक मात्र स्थिर आहे. तसेच उन्हामुळे गाय, म्हैस प्राण्यांकडून दूध देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे विक्रेत्यांना शहरास लागून असलेल्या ग्रामीण भागातील दूध मागवावे लागत आहे. घटलेली आवक आणि आयातीत होणारा खर्च यामुळे दुधाच्या दरांमध्ये वाढ करण्यात आल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT