Chhagan Bhujbal, radhakrishna vikhe patil, Sharad Pawar esakal
नाशिक

Nashik News : आरक्षणप्रश्‍नी पवारांचे मार्गदर्शन घेणे योग्यच; महसूलमंत्री विखेंकडून मंत्री भुजबळांचे समर्थन

Nashik News : राज्यात आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण होत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यात आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण होत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही समर्थन केले आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, आरक्षणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांचे मार्गदर्शन घेतलेच पाहिजे, असे सांगत त्यांनी भुजबळांची पाठराखण केली. (Minister Chhagan Bhujbal met NCP Sharad Chandra Pawar party president Sharad Pawar)

राज्याच्या राजकारणाचे ध्रुवीकरण होत चालले असून, पूर्वी अनेक राजकीय पक्ष एकत्र बसून चर्चा करीत होते. हल्ली सत्तारूढ पक्षाने विरोधकांशी बोलू नये, असे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, समाजाच्या विकासाच्या उद्देशाने आवश्यक असलेल्या विषयांवर सत्तेतील लोकांनी विरोधकांशी भेटण्यात काही गैर नसून, भुजबळांच्या भेटीमागे आरक्षण हाच मुद्दा असल्याचे महसूलमंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.

गुरुवारी (ता. १८) नाशिकमध्ये खासगी कार्यक्रमानिमित्त आल्यावर पत्रकारांशी ते बोलत होते. ‘सामाजिक सलोखा राखण्याच्या उद्देशाने भुजबळ विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटतात, यात काही गैर नाही. भुजबळ ज्येष्ठ आहेत, ते मार्गदर्शन घेण्यासाठी गेले असतील. बदलत्या वातावरणात काय भूमिका घ्यावयाची, हे त्यांचे मत आहे. त्यावर चर्चा करणे, बोलणे योग्य होणार नाही,’ असेही ते म्हणाले.

खेडकरांवरील कारवाई योग्यच

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. यावर मंत्री विखे पाटील म्हणाले, की पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी छळ केल्याची तक्रार खेडकर यांनी दिली. प्रत्यक्षात खेडकर यांच्यावर कारवाई झालेली आहे. त्यांच्या नेमणुकीवर संशय आहे. अशा वातावरणात जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कारवाई करणे अपेक्षितच आहे, ती त्यांनी केली, त्यात गैर काहीच नाही. (latest marathi news)

मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील

आदिवासी विभागाच्या जमिनी हडपणे हा प्रकार वाढत असून, हे चुकीचे आहे. याबाबत विभागीय अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत. अहवाल पाठविण्याचा सूचनाही दिल्या आहेत. पुन्हा एकदा त्याचा पाठपुरावा घेण्यास सुरवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जरांगे-पाटील पुन्हा उपोषण करीत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण विधानसभेत जाहीर केले. आता प्रश्न हा सगेसोयरे यांचा राहिलेला आहे, त्या संदर्भात मुख्यमंत्री चर्चा करीत आहेत. योग्य तो मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT