devyani farande esakal
नाशिक

Nashik News : उपनगरची घटना ही पूर्वनियोजित आमदार देवयानी फरांदे यांचा आरोप

Nashik News : उपनगर येथे झालेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आमदार फरांदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन एप्रिलला सार्वजनिक शांततेला छेद देणारी घटना घडली असून सोशलमिडीयावर भावना भडकविणारी पोस्ट टाकल्याने त्या क्रियेला प्रतिक्रिया देण्याचा हा सर्व प्रकार होता. बेकायदेशीर जमाव करणे, सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस, संघटित गुन्हेगारी कायदा या अंतर्गत पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली.

उपनगर येथे झालेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आमदार फरांदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. श्रीमती. फरांदे म्हणाल्या, की सोशल मिडियावर एका समाजाविरुद्ध चालविल्या जाणाऱ्या पेजवर वाईट पोस्ट टाकल्याने भावना दुखावल्या. त्यास प्रत्युत्तर म्हणून दुसरी पोस्ट टाकण्यात आली. यानंतर तीन एप्रिलला रात्री जमाव जमा झाला.

त्यांनी पोलिसांवर दबाव आणला. नाशिक-पुणे महामार्ग बेकायदेशीररीत्या बंद केला. खासगी व सरकारी वाहनांची तोडफोड केली. पूर्वनियोजित दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. तीन एप्रिलचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. परंतु पोलिसांनी कारवाई केलेली नाही. पोलिसांनी यासंदर्भात तपास करणे गरजेचे आहे.  (latest marathi news)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक प्रशासनाने कायदा-सुव्यवस्था राखली पाहिजे. कारवाई न झाल्यास जमावाचे मनोधैर्य वाढेल. पोलिस प्रशासनाने हा धोका लक्षात घेण्याचे आवाहन आमदार फरांदे यांनी केले. दरम्यान या संदर्भात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT