Gyanesh Kumar
esakal
Election Commission SIR Update: नवमतदार म्हणून नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने मोठा बदल केला आहे. आयोगाने एसआयआरशी संबंधीत घोषणा ऑनलाइन फॉर्म ६मधून हटवली आहे. आता ज्या राज्यात एसआयआर प्रक्रिया सुरू आहे तिथेही नव्या मतदारांना ECINet पोर्टलवर फॉर्म ६ आणि एसआयआर घोषणा वेगवेगळी भरावी लागेल. याआधी एसआयआरशी संबंधित घोषणा फॉर्म ६मध्येच होती आणि अर्जदाराला त्याचं उत्तर देणं बंधनकारक होतं.